BJP MLA: परिणय फुकेंनी फोडला 'एजंट बॉम्ब'; फडणवीसांना दिलेल्या ऑडिओ क्लिपमधील नेता कोण?

BJP MLA Parinay Phuke: निवडणुकीत एखाद्या व्यावसायिकाने त्यांचे काम केले नसेल किंवा पैसे देण्यास नकार दिला असेल त्या व्यावसायिकांच्या कारखान्यांवर, उद्योगधंद्यावर अतिक्रमण कारवाई करण्याची मागणी लक्षवेधीत केली जाते, असा आरोप फुके यांनी केला आहे.
BJP MLA Parinay Phuke:
BJP MLA Parinay Phuke:Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 13 March 2024:विधीमंडळ हे जनतेला न्याय देण्यासाठी आहे, पण या न्यायमंदिरात काही नेत्यांनी आपला गोरखधंदा सुरु केल्याची माहिती समोर येत आहे. सामान्य जनतेचे प्रश्न विधिमंडळात मांडून त्यांना न्याय देणे अपेक्षीत असतानाच काही मंत्री मात्र सभागृहात प्रश्न मांडण्यासाठी पैसे घेतात, असा गंभीर आरोप माजी मंत्री, भाजपचे आमदार परिणय फुके यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

फुके यांनी पुरावा म्हणून ऑडिओ क्लिप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये कोण मंत्री आहे, याबाबत उत्सुकता आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी फुके यांनी फडणवीसांनी केली आहे. लक्षवेधी मांडण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून बक्कळ पैशाच्या व्यवहार केला जातो का, असा प्रश्न आता सामान्य जनता विचारु लागली आहे.लक्षवेधी लागण्यापूर्वी बुधवारी परिणय फुके यांच्याकडे या क्लिक आल्या होत्या.

लक्षवेधींच्या माध्यमातून पैसे कमविण्याचा प्रकार सुरु असल्याच आरोप फुके यांनी केला आहे. गडचिरोलीतील राईस मीलच्या विरोधात लक्षवेधी लावण्यात आली होती. ही लक्षवेधी न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंट कडून राईस मील मालकांकडून पैशांची मागणी करण्यात आली होती. त्यांना धमकविण्यात आले होते, याबाबतचे ऑडिओ क्लिप मी फडणवीस यांच्याकडे दिले आहेत, असे ते म्हणाले.

BJP MLA Parinay Phuke:
Local Body Elections 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने पदाधिकाऱ्यांची 'या' पदासाठी जोरदार फिल्डिंग

फडणवीस या क्लिपची फॅारेन्सीक चौकशी करुन त्यावर पोलीस कारवाई करणार असल्याची माहिती फुके यांनी दिली आहे. तो नेता कोण, त्या नेत्याचं नाव जाहीर करणार असल्याचंही परिणय फुके म्हणाले. लवकरच त्यांचे नाव महाराष्ट्राला समजेल, असे ते म्हणाले.

निवडणुकीत एखाद्या व्यावसायिकाने त्यांचे काम केले नसेल किंवा पैसे देण्यास नकार दिला असेल त्या व्यावसायिकांच्या कारखान्यांवर, उद्योगधंद्यावर अतिक्रमण कारवाई करण्याची मागणी लक्षवेधीत केली जाते, असा आरोप फुके यांनी केला आहे. त्याचा रोख महाविकास आघाडीतील कोणत्या नेत्यावर आहे, हे लवकरच समजेल.

"२०२३ मध्ये तत्कालीन मंत्र्यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. मी यावेळीस प्रामुख्यानं ३-४ राईस मिलसंदर्भात माहिती दिली होती. या कारखान्यांना घोटाळ्यांच्या आरोपांमध्ये क्लीन चिट देण्यात आली, असे फुके यांनी सांगितले.

एका नेत्याचा राईट हॅड एका नेत्याचा लेफ्ट हॅड यांचा हा ऑडिओ क्लिप आहे, अशी माहिती फुके यांनी साम टिव्हीशी बोलताना दिली. प्रश्न न मांडण्यासाठी खंडणीची द्या, मागणी करीत त्यांनी राईस मील मालकांना धमकी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com