
Maharashtra BJP news : भाजप आमदार परिणय फुके यांच्या भावजय प्रिया फुके या आज विधानभवनावर धडकल्या. प्रिया फुके हे यांच्या मुलांसह विधानभवनावर धडकत निदर्शने केली.
न्याय मिळावा यासाठी, मुख्यमंत्र्यांची एक वर्षांपासून भेट मागत आहोत. पण ते भेट देत नाहीत. फुकेसारख्या व्यक्तीला का सेफ करत आहेत, असा प्रश्न केला. पोलिसांनी प्रिया फुके यांना विधानभवनात प्रवेश करण्याअगोदरच ताब्यात घेतलं. प्रिया फुके चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. पोलिसांनी त्यांना व्हॅनमध्ये बसवत, त्यांना तेथून पुढे घेऊन गेले आहेत.
परिणय फुके हे भाजपचे (BJP) विधान परिषद सदस्य आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आला आहे. परिणय फुकेंच्या आई यांनी सुरवातीला सून प्रिया नातवंडांना भेटू देत नाही, अशी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हा वाद्यावर प्रतिक्रिया न देता प्रिया फुके यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले. यानंतर हे वाद चांगलेच वाढत गेले. यातून आता प्रिया फुके आज थेट विधानभवनावर धडकल्या. तिथं आक्रमक निदर्शन करताना, मुंबई पोलिसांना त्यांना ताब्यात घेतलं.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या रोहिणी खडसे यांनी प्रिया फुके यांना धीर दिला. यावेळी पत्रकार परिषदेत प्रिया फुके यांनी धक्कादायक खुलासे केले. दीड वर्षांपासून न्यायासाठी लढा देत आहे. पोलिस (Police) ठाण्याच्या चकरा मारल्या, मुख्यमंत्री अन् राज्यातील इतर नेत्यांकडे मदत मागितली. पण मिळाली नाही.
संकेत फुके यांच्याशी लग्न करताना फसवणूक झाली. त्यांचं किडनी प्रत्यारोपण झालं होतं, पण त्याची माहिती लग्नापूर्वी दिली नाही. ही माहिती मिळाल्यावर फुकेंच्या घरच्यांना विचारणा केल्यावर मला आणि माझ्या कुटुंबियांना जीवाला धोका होईल, अशी धमकी दिली. पुढे मानसिक आणि शारिरीक त्रास देण्यात आला. अत्याचारासाठी माणूस पाठवण्याची धमकी देण्यात आली. संकेत फुके यांच्या मृत्यूनंतर या धमक्या अधिकच वाढल्याचा दावा प्रिया फुके यांनी वारंवार केला आहे.
प्रिया फुके आज न्यायासाठी आक्रमक होत विधानभवनावर धडकल्या. तिथं त्यांच्याबरोबर मुलं होतं. प्रिया फुके यांनी पर्समधून काही कागदं काढताना, त्यांना महिला पोलिसांनी रोखलं. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना, मुख्यमंत्र्यांकडे एक वर्षांपासून वेळ मागत आहे. न्याय हवा आहे. पण फुकेसारख्या माणसांला का सेफ करत आहे, हे समजत नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
आमदार परिणय फुके यांच्या भावजय प्रिया आक्रमक होताच, त्यांना मुंबई पोलिसांना ताब्यात घेतलं. व्हॅन बसवलं. त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी गराडा घातला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्याय द्यावा. न्याय घेण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. पण मुख्यमंत्री वेळ देत नाहीत. परिणय फुके आमच्याबरोबर ज्यापद्धतीने वागत आहे, त्यावर न्याय हवा आहे, अशी प्रतिक्रिया पोलिस व्हॅनमध्ये बसून प्रिया फुके यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.