BJP fund transfer inquiry : ‘AI’कडून आवाज काढून घेतला? भाजप आमदाराचा निधी थेट बीडला पोचला; नेमकं काय आहे प्रकरण...

Mumbai Police Probes BJP MLC Prasad Lad Over MLA Fund Transfer from Ratnagiri to Beed : विधान परिषदेतील भाजपचे सदस्य प्रसाद लाड यांचा आमदार निधी 'AI'च्या माध्यमातून आवाज काढून रत्नागिरीवरून बीडला फिरल्याचा प्रकार समोर आलं आहे.
BJP MLC Prasad Lad
BJP MLC Prasad LadSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Police investigation : आपल्या लेडरपॅडरचा गैरवापर करत, ‘AI’च्या (कृत्रिम बुद्धीमत्ता) माध्यमातून आपला आवाज काढून 3 कोटी 20 लाख रुपयांचा निधी रत्नागिरीवरून बीडला वर्ग करण्याचे सांगितल्याचा खुलासा विधान परिषदेतील भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केला.

त्यानंतर या प्रकाराच्या तपासासाठी मुंबईचे पोलिस बीडमध्ये दाखल झाले आहे. दरम्यान, हा प्रकाराची गंभीर दखल सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतली असून, सरकारने याबाबत धोरणात्मक कारवाई करावी, असे निर्देश दिले आहे.

विधान परिषदेतील भाजप (BJP) सदस्य प्रसाद लाड यांच्या लेटरपॅडवर 24 जून 2025ला बीड तालुक्यातील विविध गावांतील विविध 36 कामांसाठी 2025-26 या आर्थिक वर्षातील त्यांच्या आमदारांच्या स्थानिक निधीतून प्रत्येकी 10 लाख रुपयांचा निधीची (एकूण 3 कोटी 60 लाख रुपये) शिफारस करणारे पत्र जावक क्रमांकासह जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे देण्यात आले.

पुढे हे पत्र निधी हमीसाठी संबंधित आमदारांच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. त्यावरून हे गौडबंगाल उघड झाले आहे. दरम्यान, मुंबईतील (Mumbai) दोन पोलिस अधिकाऱ्यांनी बीड इथं येत चौकशी सुरू आहे.

BJP MLC Prasad Lad
आणि म्हणून Mumbai Congress अध्यक्षपदी Varsha Gaikwad ! | Ashok Jagtap | Congress | BMC Elections

हा निधी वळवण्यासाठी प्रसाद लाड यांचा ‘AI’च्या माध्यमातून आवाज काढून घेण्यात आलाचा प्रकार घडला आहे. तशी प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत खुलासा केला आहे. मी प्रसाद लाड बोलतोय, आताच्या आता निधी वर्ग करा, असे संबंधित अधिकाऱ्यांना सुनावल्याचे आमदार लाड यांनी सभागृहात सांगितले. ते कोण आहेत त्यांची नावे कळालेली आहेत. त्यामुळे सरकारने पोलिसांना आदेश देऊन चौकशी करून त्यांना अटक करावी, ते कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आमदार लाड यांनी केली.

BJP MLC Prasad Lad
Hindi Row: मराठी की हिंदी उडतसे धुरळा, सोयीचा हा सोहळा साऱ्या दांभिकांचा!

बीडमधील या ठिकाणी वळवला निधी

या निधीत बीडमधील ताडसोन्ना, परभणी केसापुरी, बहिरवाडी, लोणी शहाजानपूर, शहाजानपूर लोणी, उमरद (जहागीर), लिंबारुई देवी, नाळवंडी, रामगाव तसेच वडवणी तालुक्यातील देवडी, गेवराई तालुक्यातील खामगाव, किनगाव, तलवाडा, भेंड खुर्द, लुखामसला, गुळज त्याच बरोबर शिरुर कासार तालुक्यातील मानूर, जाटवट या गावांत पेव्हर ब्लॉक, हायमास्ट सौर पथदिवे सिमेंट रस्ता अशी कामे सुचविण्यात आली आहेत. आता हे पत्रच बनावट असल्याचे समोर आलं आहे.

सभापती शिंदेंना फसवण्याचा प्रयत्न

भाजप आमदार श्रीकांत भारतीय, उमा खापरे, निरंजन डावखरे यांनाही अशाप्रकारचा अनुभव आला आहे. मला स्वत:लाही सभापतिपद स्वीकारण्यापूर्वी अशाच प्रकारच्या फसवणुकीचा अनुभव आल्याचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. पण मी जागरूक असल्याने तत्काळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, असे सांगत हा प्रकार सरकार आव्हान देणारा आहे. त्यामुळे सरकारने दखल घेऊन, अशा घटना घडणार नाहीत, यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे, त्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश सभापती प्रा. राम शिंदेंनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com