सव्वीस वर्षांच्या राजकारणानंतर सुरेश प्रभुंची मोठी घोषणा; आता फक्त एकच ध्येय...

2014 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर प्रभू यांनी शिवसेनेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला.
Suresh Prabhu
Suresh PrabhuSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मागील 26 वर्षांपासून राजकारणात आपला ठसा उमटवलेले माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू (Suresh Prabhu) यांनी मोठी घोषणा केली आहे. यापुढे निवडणूक (Election) लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. आता यापुढे पर्यावरणाशी संबंधित प्रश्न सोडवण्यालाच प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. प्रभू हे 2014 मध्ये मंत्री झाले त्यावेळीही लोकसभा निवडणूक लढवली नव्हती.

कणकवलीत आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या मेळाव्यात प्रभू यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यामुळे राजकारणात आल्याचे सांगत प्रभू म्हणाले, माझा सीएचा व्यवसाय चांगला चालत होता. पण कुटुंबीयांचा विरोध असतानाही राजकारणात आलो आणि खासदार झालो. राजकारणात आल्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून सिंधुदुर्गात विकासाची अनेक कामे केली.

Suresh Prabhu
नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत असताना डिसले गुरूजींसाठी IAS घोलप आले धावून

आता राजकारणविरहित प्रश्न सोडवायचे आहेत. हवामानात बदल होत असून पर्यावरणाचे प्रश्न उभे राहत आहेत. वादळांची संख्या वाढत आहे. वर्षभर अवकाळी पावसाचे सावट निर्माण होत आहे. त्यामुळे लोकांशी संबंधित पर्यावरणाचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले आहे. सध्या ते जून 2016 पासून राज्यसभेचे (Rajya Sabha) सदस्य असून आंध्र प्रदेशचे (Andhra Pradesh) प्रतिनिधित्व करत आहेत.

सुरेश प्रभू हे मार्च 1996 मध्ये राजकारणात (Politics) आले. त्यांनी शिवसेनेच्या (Shiv Sena) तिकीटावर राजापुर लोकसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढवली. त्यानंतर 2009 पर्यंत त्यांनी चारवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. लोकसभेत पहिल्यांदाच गेल्यानंतर त्यांना उद्योग खात्याचे मंत्रिपदही मिळाले. त्यानंतर 1998 मध्ये पर्यावरण व वन, 1999 मध्ये खते व रसायन ही खाती मिळाली. या काळात त्यांनी ऊर्जा, जड उद्योग ही खातीही सांभाळली.

Suresh Prabhu
अजितदादांना अर्थमंत्र्यांची एकच घोषणा आवडली अन् लगेच त्यावर सल्लाही दिला!

2014 मध्ये भाजपची (BJP) सत्ता आल्यानंतर प्रभू यांनी शिवसेनेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. मोदी सरकारने प्रभू यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी दिली. 2014 ते 2017 अशी तीन वर्ष त्यांनी रेल्वे मंत्रिपद सांभाळलं. त्यानंतर पुढील दोन वर्ष ते वाणिज्य व उद्योग मंत्री होते. 2018 ते 2019 या वर्षभरात त्यांच्याकडे नागरी हवाई वाहतूक खातं आलं. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये मात्र त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com