मुंबई : भाजपने राज्यसभा निवडणुकीत तिसरी जागा निवडून आणत महाविकास आघाडीचा धडा शिकवला होता. राज्यसभा निवडणुकीत दोन आजारी आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या मतदानामुळे भाजपला हे यश मिळालं होतं. (Bjp mla Mukta Tilak news)
विधानपरिषदेसाठी (Legislative Council election 2022) हे दोन्ही आमदार मतदान करणार आहेत. मुक्ता टिळक या विधानभवनात पोहचल्या असून काही वेळातच जगताप हेही विधानभवनात दाखल होणार आहेत.
कसबापेठ मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक या पुण्याहून ऍम्ब्युलन्सने विधानभवनात पोहचल्या आहेत.त्यांचे स्वागत भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. यावेळी माध्यमांशी बोलताना टिळक म्हणाल्या, "निवडणुकीत सर्व पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. पक्षाने दिलेला आदेश पाळायचे हे आमच्या रक्तात भिनलेले आहे. म्हणून मी मतदानाला जात आहे,"
भाजपनं राज्यसभा निवडणुकीत सहावी जागा जिंकल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी हा विजय आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक यांना समर्पित केला होता. याबाबत टिळक म्हणाल्या, "फडणवीसांनी आम्हाला व्यक्तीशा फोन करून आभार मानले. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू येथे कार्यक्रमासाठी आल्यानंतर सुद्धा त्यांनी आमच्या बाबतची माहिती पंतप्रधान यांना दिली. त्याचप्रमाणे मला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही फोन आला आणि त्यांनी तब्येतीची विचारपूस केली,"
कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक कॅन्सरने पीडित आहेत. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हे सुद्धा आजारी असून त्यांना चालतानाही अडचणी जाणवत असल्याने ते कार्डियाक रुग्णवाहिकेतून चिंचवड ते मुंबई प्रवास करून विधान भवनात दाखल होत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.