Nitesh Rane Vs Shiv Sena Thackeray Party : शिवसेना ठाकरे पक्षावर चौफेर टीका; नीतेश राणे म्हणाले, 'मुंबईचे खरे लुटारी मातोश्रीवर'

Nitesh Rane roundly criticized the Shiv Sena Thackeray party : भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर चौफेर टीका केली. मुंबई लुटणारे 'मातोश्री'वरच बसले आहे. त्यांना हद्दपार करण्याची वेळ आली आहे, असे आमदार राणे यांनी म्हटले.
Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजप नेते नीतेश राणे शिवसेना उद्धव बाळासाहेव ठाकरे पक्षांवर चौफेर टीका केली. उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्याचा देखील नीतेश राणे यांनी समाचार घेतला. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली.

"शिवसेना ठाकरे पक्षाकडून नेहमी मुंबई लुटण्याची भाषा केली जाते. यावर मुंबईला लुटण्याची हिंमत कोणी करणार नाही. मुंबई लुटणारे मातोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावर राहतात, त्यांना हद्दपार करण्यासाठी आम्ही एकत्र आहोत", असेही नीतेश राणे यांनी म्हटले.

भाजप नेते (BJP) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कच्चा लिंबू असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती. नीतेश राणेंनी यावर राऊत यांना सडका आंबा म्हणत, पेटी नासवेल, असा टोला मारला. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी त्यांच्या भाषणात अदानी आणि अंबानी यांच्यावर सतत भूमिका मांडतात. यावर नीतेश राणे यांनी संजय राऊत यांना शरद पवार यांनी अदानी यांच्यावर भूमिका स्पष्ट करायला सांगाव, असे आव्हान दिलं. शरद पवार कृतीतून उद्धव ठाकरेंना फाट्यावर मारण्याचे काम करत असल्याचा सणसणीत टोला आमदार राणे यांनी लगावला.

Nitesh Rane
Video MNS NEWS : मोठी बातमी! मनसेकडून बाळा नांदगावकरांना उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराविरोधात उमेदवारी

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दिल्ली दौऱ्यावर देखील नीतेश राणे यांनी सडकून टीका केली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे बोनस मागण्यासाठी जात असेल, सांगून बाळासाहेबांचे विचार बाजूल ठेवून उद्धव ठाकरे काँग्रेसवासी झाल्याचा टोला नीतेश राणे यांनी लगावला.

Nitesh Rane
Congress News : काँग्रेसच्या बैठकीला बोलावले जात नाही; हायकमांडकडे आमदार झिशान सिद्दिकी करणार तक्रार

सालियन आणि राजपूत प्रकरण

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सभागृहात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यावेळी तो लादेन आहे का, असा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरेंनी केल्याची आठवण नीतेश राणे यांनी करून दिली. सचिन वाझेमुळे महाविकास आघाडीतील आणि त्यांच्या घरातली भांडण बाहेर येत आहेत. सचिन वाझे यांना कोण कुठे घेऊन फिरायचा त्याचे पुरावे दाखवावे लागतील, असे देखील नीतेश राणे यांनी म्हटले. नीतेश राणे यांनी दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत यांच्या प्रकरणाचा मुद्दा पुन्हा लावून धरला. आदित्य ठाकरे आणि संजय राऊथ यांची याप्रकरणी नार्को चाचणी झाली पाहिजे, असे नीतेश राणे यांनी म्हटले.

लव्ह जिहाद, वक्फ बोर्डावर भाष्य

संजय राऊत रोज सकाळी हिंदूंची बदनामी करत आहे. ही बदनामी त्यांनी थांबवावी. लव्ह जिहाद हा मुद्दाच आहे. हिंदुनी मुस्लिमांना धर्म बदलण्यासाठी जबरदस्ती केली, अशी एक तरी केस दाखवावी, असे आव्हान देत 100 टक्के लव्ह जिहाद मुस्लिम लोक करतात, असे नीतेश राणे यांनी म्हटले. वक्फ बोर्डावर देखील नीतेश राणे यांनी भूमिका मांडली. वक्फ बोर्ड आणि त्याचा कायदा फक्त आपल्या देशात आहेत. इतर देशात कायदा नाही. या वक्फ बोर्डात फक्त मुस्लिम अधिकारी आहेत, याकडे देखील नीतेश राणे यांनी लक्ष वेधले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com