उद्धव ठाकरेंच्या 'भारत जोडो' यात्रेच्या सहभागावरून भाजपने उडवली खिल्ली, म्हणाले...

Uddhav Thackeray : काँग्रेस कडून उद्धव ठाकरेंना 'भारत जोडो' यात्रेत सहभागी होण्याचे आदेश!
Bharat Jodo Yatra Latest News
Bharat Jodo Yatra Latest NewsBJP Twitter
Published on
Updated on

पुणे : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुरू केलेली 'भारत जोडो' यात्रा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातून राज्यात प्रवेश करणार आहे. यामळे आपणही या यात्रेत सहभागी व्हावे, असे निमंत्रण काँग्रेसच्या शिष्टमंडळाकडून काल (ता.१८ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.

दरम्यान, या दोन्ही नेत्यांनीही हे निमंत्रण स्वीकारल्याचे समजते. यामुळे पवार आणि उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे या यात्रेत सहभागी होणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान ठाकरेंच्या या यात्रेतील सहभागावरून भाजपने व्यंगचित्राच्या माध्यमातून ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. (Bharat Jodo Yatra Latest News)

Bharat Jodo Yatra Latest News
चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्याने पिंपरीतील YCM रुग्णालयाची तोडफोड

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते अमरनाथ राजूरकर यांच्या शिष्टमंडळाने 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे तर सिल्व्हर ओक येथे शरद पवारांनाची भेट घेतली आणि या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. यावरून ठाकरे आणि पवार या यात्रेत सहभागा होतील, असे बोलले जात आहे. यावरून भाजपकडून उद्धव ठाकरेंवर टीका करण्यास सुरूवात करण्यात आली असून भाजपने आपल्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरून एक व्यंगचित्र ट्वीट करत ठाकरे आणि पवारांची खिल्ली उडवली आहे. या चित्राला "काँग्रेस कडून उद्धव ठाकरेंना 'भारत जोडो' यात्रेत सहभागी होण्याचे आदेश!", असे कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, भारत जोडो यात्रेनिमित्ताने राहूल गांधी यांची कित्येक किलोमीटरची पायपीट आणि त्यात सर्वसामान्यांना सोबत घेत ढवळून काढलेले वातावरण यामुळे त्यांच्या या यात्रेची जगभरात चर्चेत होत आहे. ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. तामिळनाडूतील कन्याकुमारी पासून सुरू झालेल्या या भारत जोडो यात्रेचा प्रवास केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, हरयाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि पंजाब असा असणार आहे.

Bharat Jodo Yatra Latest News
Congress : जंगलव्याप्त गावांतील शाळा बंद केल्यास खबरदार; कॉंग्रेसने दिला इशारा !

ही यात्रा महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यात साधरणतः ५ तारखेला दाखल होण्याची शक्यता आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत समाजातील प्रत्येक घटक या यात्रेत सहभागी होतांना दिसतआहे. राहूल गांधी यांचा या यात्रेतील साधेपणा सगळ्यांनाच भावत असल्याने महाराष्ट्रात देखील भारत जोडो यात्रेचे असेच जल्लोषात आगमन झाले पाहिजे, यासाठी कॅाग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तयारीला लागले आहेत. आता ठाकरे आणि पवार या यात्रेत सहभागी होणार का हे पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com