Ravindra Chavan : कल्याण-डोंबिवलीत भाजपला मोठा धक्का; मंत्री चव्हाणांच्या निकटवर्तीयांनी सोडली साथ

BJP News : जाणून घ्या, काय सांगितलं कारण; विकास म्हात्रे हे कॅबिनेटमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.
Vikas Mhatre
Vikas MhatreSarkarnama
Published on
Updated on

Kalyan-Dombivli Politics : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी आपल्या माजी नगरसेविका पत्नीसह भाजप सदस्यपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. विकासकामे होत नाहीत, निधी मिळत नाही, असा आरोप विकास म्हात्रे यांनी केल्याने कल्याण-डोंबिवलीच्या संपूर्ण राजकीय वर्तुळात भाजपला हा एक मोठा धक्का आहे.

विशेष म्हणजे हे पत्र विकास म्हात्रे यांच्याजवळच्या व्यक्तीने सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. यामुळे स्वतःला गतिमान सरकार म्हणवून घेणाऱ्या महायुतीच्या सरकारमध्ये निधीवाटपावरून मतभेद तर नाही ना, अशी चर्चा रंगली आहे.

विकासकामांच्या गप्पा मारणाऱ्या भाजपचे माजी स्थायी सभापती म्हात्रे यांनी विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार करीतच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये त्यांनी रस्त्यावरील खड्ड्याचा मुद्दा अधोरेखित केला आहे. काम होत नसल्याने नागरिकांना सामोरे जाणे कठीण झाले असून भाजप (BJP) विरुद्ध असंतोष असल्याचे त्यांनी राजीनामा दिलेल्या पत्रात म्हणत त्यांनी घरचा आहेर दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vikas Mhatre
Mumbai North East LokSabha Constituency : मुंबई उत्तर-पूर्वमधून मनोज कोटक यांच्यासमोर किरीट सोमय्यांचा अडसर ?

मंत्री चव्हाण नाराजी दूर करणार का?

विकास म्हात्रे हे कॅबिनेटमंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांनी अशा प्रकारे राजीनामा दिल्यानंतर आता कॅबिनेटमंत्री काय प्रतिक्रिया देणार, त्यांची नाराजी कशी दूर करणार, हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर विकास म्हात्रे डोंबिवलीच्या बाहेर गेले आहेत. त्यांचा फोनही लागत नसल्याने यासंदर्भात त्यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Ravindra Chavan
Ravindra ChavanSarkarnama

दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच कल्याण लोकसभेची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुत्र श्रीकांत शिंदे लढवत असल्याने प्रतिष्ठेची समजली जाते. महायुतीमध्ये असलेले सर्वच मित्रपक्ष त्यांना साथ देणार आहेत, तर महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवार जाहीर झालेला नाही, असे असले तरी मनसेचा महाराष्ट्रातील एकमेव आमदार राजू पाटील हे याच लोकसभा मतदारसंघातील एक आमदार आहेत. त्यामुळे मनसे नेमका कोणाला पाठिंबा देणार की स्वतः लढणार, या चर्चेला आता उधाण आले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R...

Vikas Mhatre
Raju Patil News : मनसे आमदार राजू पाटील लोकसभा निवडणूक लढणार? काय असणार राज ठाकरेंचा निर्णय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com