परिवहन मंत्री सध्या कोणत्या वसुलीत गुंतलेत!

शिवसेनेत कदम विरुद्ध परब कोल्डवॉर सुरू असल्याने महाविकास आघाडीने परिवहन खाते रामभरोसे.
Keshav Upadhye, Anil Parab
Keshav Upadhye, Anil Parabsarkarnama

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यात उपसले आहे. दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण करावे, या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावरुन भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी महाविकास आघाडी सरकार व परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर निशाणा साधला आहे. (BJP spokesperson Keshav Upadhyay criticizes Anil Parab)

Keshav Upadhye, Anil Parab
परमबीरसिंग अन् रश्मी शुक्ला पुन्हा अडचणीत; भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी समन्स

या संदर्भात केशव उपाध्ये यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, ''च्या 306 कर्मचाऱ्यांचा कोविड मध्ये मृत्यू २५ कर्मचाऱ्यांची आत्महत्या पण उद्धव ठाकरे यांचे सरकार मात्र थंड आहे. परिवहन मंत्री सध्या कोणत्या वसुलीत इतके गुंतलेत की, त्यांना ST कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही? मुळात अनिल परब आहेत कुठे?'', असा सवाल उपाध्ये यांनी केला आहे.

''शिवसेनेत कदम विरुद्ध परब कोल्डवॉर सुरू असल्याने महाविकास आघाडीने परिवहन खाते रामभरोसे सोडलंय असं दिसतंय. मुख्यमंत्री ST कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करणार का? आर्यनचे पाठीराखे व ड्रग्ज विरोधी मोहीमेवर टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक या प्रश्नावर बोलणार नाहीत कारण सर्वसामान्यांचा प्रश्न आहे.'' असा टोला उपाध्ये यांनी लगावला आहे.

Keshav Upadhye, Anil Parab
फडणवीसांनी माहिती दडविल्याच्या प्रकरणात निवडणूक अधिकाऱ्यांना समन्स...

27 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरु होणार आहे. पगारवाढ त्याचबरोबर महागाई भत्त्यात वाढ मिळावी यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली आहे. आंदोलनाचा तिढा वेळी सुटला नाहीतर ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com