परमबीरसिंग अन् रश्मी शुक्ला पुन्हा अडचणीत; भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी समन्स

भीमा कोरेगाव प्रकरणाची आयोगामार्फत चौकशी सुरू आहे.
Parambir Singh, Rashmi Shukla
Parambir Singh, Rashmi Shuklasarkarnama
Published on
Updated on

पुणे : फोन टॅपिंग प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला (rashmi shukla) आणि १०० कोटी वसुली प्रकरणामुळे बेपत्ता झालेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग (Parambir Singh) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी चौकशी आगोयाने दोघांनाही समन्स बजावला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणाची आयोगामार्फत चौकशी सुरू आहे. (Summons to Parambir Singh and Rashmi Shukla)

चौकशी आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी या संदर्भात अर्ज केला आहे. कोरेगाव भीमा येथे हिंसाचार घडला त्यावेळी परमबीर सिंग हे ADG law पदावर होते. तर शुक्ला या पुणे पोलिस आयुक्त होत्या. हिंसाचाराच्या घटनेच्या अनुषंगाने त्यांच्याकडील इंटेलिजन्स इनपुट व इतर माहिती महत्वाची आहे. त्यामुळे त्यांची साक्ष आवश्यक असल्याचे सातपुते यांनी सांगितले. सातपुते यांचा अर्ज मंजूर करत आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती जे एन पटेल यांनी परमबीरसिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स जारी करण्याचे आदेश दिले.

Parambir Singh, Rashmi Shukla
फडणवीसांनी माहिती दडविल्याच्या प्रकरणात निवडणूक अधिकाऱ्यांना समन्स...

दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरणी शुक्ला यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. शुक्ला पोलिस महासंचालक आणि राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत असताना अधिकाऱ्यांच्या बदल्यांविषयी अनेक मंत्र्यांच्या पीएनजी तसेच काही खाजगी व्यक्तींचे फोन टॅप केले होते. याबाबतचा एक अहवाल त्यांनी तयार केला होता. याच प्रकरणी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वाद सुरु आहे. आता परत एकदा भीमा कोरेगाव प्रकरणी रश्मी शुक्ला यांना चौकशीला बोलवले आहे.

Parambir Singh, Rashmi Shukla
अमरिंदर सिंग अडचणीत; निवासस्थानी राहणारी 'ती' महिला कोण : चौकशीचे आदेश

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप करणारे परमबीरसिंग गेल्या कित्येक दिवसांपासून गायब आहेत. न्यायालयात देखील सुनावणीसाठी येत नाहीत. तर तपास यंत्रणांसमोर चौकशीसाठी हजर होत नसल्यामुळे ते फरार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती चंडीवाल आयोगासमोर सुनावणी सुरू असताना त्यांच्या वकिलांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com