तुझे बाबा भेटतच नाहीत! चंद्रकांतदादांची अदित्य ठाकरेंना विचारणा

भाजपचे राज्यातील नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची वारंवार भेट घेत असतात.
Chandrakant Patil, Aditya Thackeray
Chandrakant Patil, Aditya Thackeraysarkarnama
Published on
Updated on

मुंबई : अरे बाबा, जर तुझे बाबा कि जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मी एका राष्ट्रीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असताना मलासुद्धा भेटत नाहीत. तर मग आम्ही राज्यपालांकडे जाणार नाही तर कुणीकडे जाणार, अशी बोचरी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर केली.

Chandrakant Patil, Aditya Thackeray
मी तालुक्यात शेरच; पक्षप्रमुखांनी आदेश दिला तर लोकसभेला विरोधात लढणारच..

भाजपचे राज्यातील नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची वारंवार भेट घेत असतात. याबाबत अदित्य ठाकरे यांनी टीका करताना म्हटले होते की, राज्यपाल कार्यालय हे राजकीय अड्डा बनत चालले आहे. अदित्य ठाकरे यांच्या विधानाचा संदर्भ घेत पाटील यांनी यांच्यासह शिवसेनला टोला लगावला. पाटील म्हणाले की, अरे बाबा, जर तुझे बाबा कि जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मी एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष असताना मलासुद्धा भेटत नाहीत. तर मग आम्ही राज्यपालांकडे जाणार नाही तर कुणीकडे जाणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसापुर्वी मणक्याची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर ठाकरे विश्रांतीवर घेत आहेत. यामुळे त्यांच्यावर भेटत नसल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.

Chandrakant Patil, Aditya Thackeray
सरनाईकांची आमदारकी जाणार? सोमय्यांनी टाकले मोठे पाऊल

मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी शिवसेनिकांना उद्देशून केलेल्या भाषणावर टीका करताना पाटील म्हणाले की, ठाकरे यांच्या सगळ्या भाषणात थयथयाट आहे. नैराश्य व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भाषा योग्य नाही. नगरपंचायतीच्या निकालाचे विश्लेषण ही शिवसेनेला पटलेले नाही. शिवसेनेला विचार करायला लावणारी स्थिती राज्यात आहे. आपल्या पक्षाचा ऱ्हास होत चालला आहे तेव्हा असा थयथयाट केला जातो का असा सवाल पाटील यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com