Bawankule On Thackeray: 'आता कसं वाटतं...?' बावनकुळेंचा ठाकरेंना खोचक टोला

Chandrashekhar Bawankule and Uddhav Thackeray : पक्ष संघटना आणखी मजबूत करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी '2024 संकल्प दौरा' सुरु केला आहे.
Uddhav Thackeray and Chandrashekhar Bawankule
Uddhav Thackeray and Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Dombivali News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने आतापासूनच जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपचे सरकार केंद्रात पुन्हा आणण्यासाठी भाजपने मोठी रणनीती आखली आहे. पक्ष संघटना आणखी मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी '2024 संकल्प दौरा' सुरु केला आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी ते डोंबिवलीत होते, यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली होती, त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, प्रभू श्रीरामांचे अयोध्येत मंदिर झाले पाहिजे. त्यावेळी काँग्रेस वाले आणि आता उद्धव ठाकरे हे भाजप वाल्यांना म्हणतायेत की, 'मंदिर वही बनायेंगे लेकीन तारीख नही बताऐंगे' आता किती तारीख आली. आता कसं वाटतं काँग्रेसला अन् उद्धव ठाकरे यांना...गार गार वाटतं ना..., असे म्हणत बावनकुळे यांनी विरोधकांना टोला लगावला.

Uddhav Thackeray and Chandrashekhar Bawankule
Kalyan Dombivali BJP: डोंबिवलीत भाजप संकल्प दौऱ्यादरम्यान गोंधळ; तरुणाचा भर कार्यक्रमात बावनकुळेंना सवाल

'आपण सर्वजण 527 वर्षे वाट पहात आहोत. किती पिढ्या यामध्ये गेल्या. विरोधकांनी आपल्याला सुनावले, पण आता तारीख त्यांना समजली असेल', असे बावनकुळे म्हणाले. तर जानेवारी महिन्यात अयोध्येत आपल्याला लोकांना घेऊन जायचे आहे. माझ्या मतदारसंघात 3 लाख मतदार आहेत. दिड लाख तरी घेऊन जाऊ, असे मंत्री चव्हाण म्हणाले. तर त्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, खटारा बस नको, एअर कंडिशनर बसने घेऊन जा, असे म्हणाले.

कार्यक्रमात तरुणाची घोषणाबाजी...

एका मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणाने एक मराठा लाख मराठा, अशी घोषणा बाजी केली. यानंतर बावनकुळे यांनी देखील मंचावरून एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. तसेच यावर प्रतिक्रिया देत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच यावर योग्य तो निर्णय घेतील, सर्व पक्ष हे मराठा समाजाच्या बाजूने असून शिंदे यांच्या भूमिकेशी आम्ही सर्व सहमत असू, असेही बावनकुळेंनी सांगितले.

Edited By- Ganesh Thombare

Uddhav Thackeray and Chandrashekhar Bawankule
Hemant Patil Resign : मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या हेमंत पाटलांचा मोठा निर्णय, थेट खासदारकीवर सोडलं पाणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com