Sudhir Mungantiwar Claims Congress Leaders : काँग्रेस नेत्यांच्या BJP प्रवेशावर मुनगंटीवार म्हणतात, "फडणवीसांनी हाऊसफुलचा बोर्ड लावला...

Maharashtra Politics : हा बोर्ड योग्य वेळी तो काढला जाईल,"
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama

Mumbai : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीही फुटली, अनेक नेते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. आता काँग्रेसचे काही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु आहे, यावर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टोला लगावला. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

"भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी रांगा लागल्या आहेत. काँग्रेसचे नेते आमच्या संपर्कात आहेत. भारतीय जनता पक्षात येण्यासाठी रांग लागली आहे. आमचे नेते देवेंद्र फडणवीसांनी हाऊसफुल्लचा बोर्ड लावला आहे," असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. "फडणवीसांनी नो रूम अॅव्हेलेबल, हाऊसफुल असा बोर्ड लावला आहे. हा बोर्ड योग्य वेळी तो काढला जाईल," असा टोला त्यांनी लगावला आहे.

Sudhir Mungantiwar
India Alliance Meeting : राहुल गांधी, खर्गे, पवार, ठाकरे, ममतादीदी अन् नितीशबाबू ठरविणार पुढची रणनीती

"काँग्रेसमधील अनेक नेत्यांशी बोलणं झालं आहे. काँग्रेसचे नेते अधूनमधून भेटत असतात, असे सांगत मुनगंटीवार यांनी ‘‘काँग्रेसच्या एका नेत्याने सांगावं की, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही, असे आव्हान दिले आहे.

अनेक दिवसापासून राज्य मंत्रिमंडळ विस्तार अद्याप रखडलेला आहे. त्यावरही सुधीर मुनगंटीवार म्हणाले, "मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा फिजिक्सच्या विषयाला केमिस्ट्रीचा पेपर कसा येईल? मी अजून मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न केला नाही. मी माझ्या खात्याचे काम करतोय," असे मुनगंटीवार म्हणाले.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com