रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपद मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी केली 'दिवाळी' साजरी

आमदार रवींद्र चव्हाण ( Ravindra Chavan ) यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाल्याने सध्या डोंबिवली आणि ग्रामीण भागात जल्लोष साजरा करण्यात येत आहे.
BJP workers
BJP workers Sarkarnama
Published on
Updated on

BJP News : डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण ( Ravindra Chavan ) यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाल्याने सध्या डोंबिवली आणि ग्रामीण भागात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. फटाके वाजवून आणि एक मेकांना पेढे वाटून भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांना मंत्री पद मिळाल्याने आम्ही आज दिवाळी साजरी करत आहोत आणि जर मनसे आमदार राजू पाटील यांना मंत्रिपद मिळाल्यास ग्रामीण दसरा साजरा करू अशी प्रतिक्रिया भाजप कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांनी दिली.

राज्यातील सत्ता संघर्षाच्या कालखंडात मंत्रीमंडळाचा विस्तार लांबला होता. अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाला आहे. या मंत्रीमंडळात डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्री पद मिळालं आहे.त्यामुळे डोंबिवली आणि ग्रामीण भागात भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे.यावेळी फटाके वाजवून एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला गेला.

BJP workers
कनेक्शन लूज की टाईट.. रवींद्र चव्हाण यांनी दिले हे उत्तर!

रवींद्र चव्हाण हे 2005 मध्ये भाजपकडून पहिल्याच टर्ममध्ये नगरसेवक झाले होते. त्यानंतर 2007 मध्ये स्थायी समिती सभापतीपदी निवड झाली. नगरसेवक असतानाच 2009मध्ये आमदारकी लढवत मनसेच्या राजेश कदम यांचा पराभव केला. तेव्हापासून आजतागायत डोंबिवलीमधून सतत 3 वेळा आमदार आहेत.

BJP workers
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचे रवींद्र चव्हाण यांना बळ; श्रीकांत भारतीय सरचिटणीसपदी

देवेंद फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पद कार्यकाळात रायगडचे पालकमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. फडणवीस यांच्या मर्जीतील आमदार म्हणून ख्याती आहे. तर नुकत्याच झालेल्या सत्तापालट मध्ये महत्वाची भूमिका त्यांनी बजावली होती. शिवसेनेच्या आमदारांचे गुजरात आणि आसाममधील नियोजन करण्याचे काम त्यांनी यशस्वीपणे पारपाडले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com