Narendra Modi Photo : भाजपने निषेध केला उद्धव ठाकरेंचा; मात्र फोटो जाळला पंतप्रधान मोदींचा, ठाण्यात नेमके काय घडले?

Thane BJP Vs Uddhav Thackeray : अतिउत्साही भाजप कार्यकर्त्यांवर पक्ष काय कारवाई करणार?
BJP Thane
BJP ThaneSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाच्या मुखपत्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाचा बोचऱ्या शब्दात समाचार घेतला आहे. यावरून आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेले वृत्तपत्र जाळून खासदार संजय राऊतांसह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निषेध केला. मात्र आंदोलनात जाळलेल्या मुखपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही फोटो असल्याचे लक्षात येताच आंदोलनकर्ते भाजपचे पदाधिकारी गोंधळले. मोदींचा फोटो जाळल्याचे निदर्शनास आणून देत ठाकरे गटाचे नेते हे आंदोलन भाजपवरच उलटवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे या आंदोलनाच्या झळा आंदोलनकर्त्यांना भीती आहे. (Latest Political News)

BJP Thane
Raj Thackeray On Maharashtra : सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नाही; मोजके बोलून राज ठाकरेंनी भाजपला इशारा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रातून टार्गेट केले. यामुळे भाजपच्या ठाणे शहरातील कार्यकर्त्यांनी या वृत्तपत्राची होळी केली. या वृत्तपत्रात १६ ऑगस्ट रोजी प्रकाशित झालेल्या अंकाचाही समावेश होता.

या अंकाच्या पहिल्या पानावर नरेंद्र मोदी यांचा फोटा आणि बातमी छापलेली होती. याकडे मात्र अतिउत्साही कार्यकर्त्याचे लक्षच गेले नाही. भावनेच्या भरात त्यांनी तो अंकही पेटवला. ही बाब लक्षात येताच भाजप पदाधिकाऱ्यांची मात्र भलतीच ताळांबळ उडाल्याचेही दिसून आले. ठाण्यातील या प्रकारामुळे भाजप आता काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

BJP Thane
Konkan News : शिंदे–फडणवीस सरकारच्या कारवाईचा धसका ? ठाकरेंच्या दोन्ही आमदारांचे महामार्गाच्या प्रश्नावर मौन

मुखपत्राच्या आग्रलेखात उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या जोरदार टीका करण्यात आली होती. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अस्वस्थ झाले. या आग्रलेखाचा निषेध करण्यासाठी ठाणे शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी शनिवारी सायंकाळी खोपट येथील चौकात मुखपत्राच्या अंकांची होळी केली.

होळी करण्यासाठी फक्त शनिवारी प्रकाशित झालेल्या अंकांसह काही जुन्या अंकही आणले. त्यामध्ये १६ ऑगस्टच्या अंकात स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोसह बातमी होती. हा मोदींचा फोटो असलेला अंकही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी यावेळी पेटवला. काही जणांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कार्यकर्त्यांची एकच पळापळ उडाल्याचे दिसून आले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com