धार्मिक मुद्द्यांतून वातावरण बिघडवण्याचे भाजपचे षडयंत्र.... नाना पटोले

नाना पटोले Nana Patole म्हणाले, केंद्रातील मोदी सरकार Modi Government हे सर्व आघाड्यांवर कुचकामी Ineffective ठरले आहे.
Nana Patole News
Nana Patole Newssarkarnama
Published on
Updated on

मुंबई : देशातील सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून रुपयाची दररोज घसरण होत आहे. महागाई व बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. जनतेच्या जीवन मरणाचे प्रश्न असताना धार्मिक मुद्द्यांना पुढे करून वातावरण बिघडवायचे व मुख्य प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे एक मोठे षडयंत्र भाजपकडून सुरु आहे. परंतु, काँग्रेस जनतेच्या हितासाठी केंद्र सरकारला जाब विचारत राहिल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. (Nana Patole News)

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार हे सर्व आघाड्यांवर कुचकामी ठरले आहे. महागाई, शेतकरी, कामगार, गरिबांचे केंद्र सरकार प्रश्न सोडवू शकले नाही. काँग्रेस पक्षाला आजच्या परिस्थितीची चिंता वाटते म्हणून जनतेला न्याय कसा मिळेल यासाठी आमची लढाई सुरु आहे. केंद्र सरकारने जनतेला दिलासा देण्याचे निर्णय घेतले पाहिजेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहेत.

Nana Patole News
आमचे गुडलक सोबत म्हणून तुम्ही सत्तेत; नाना पटोलेंचा आदित्य ठाकरेंना सूचक इशारा

हिंदू धर्माबद्दल आम्हाला दुसऱ्यांकडून शिकण्याची गरज नाही, माणुसकी हा खरा धर्म असून ती जोपासली पाहिजे. जनतेचे प्रश्नच सोडवणार नसले तर ते सरकार काय कामाचे. काँग्रेस पक्षाने सातत्याने जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर संघर्ष केला आहे. आजही आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी केंद्र सरकारविरोधात उभे आहोत. महागाईप्रश्नी विरोधी पक्ष राज्य सरकारकडे बोट करत आहेत हे साफ चुकीचे आहे, याप्रश्नी विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत.

Nana Patole News
केतकी चितळेला पुन्हा झटका; अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटक अन् पाच दिवसांची पोलीस कोठडी

महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात कोणतीही करवाढ केलेली नाही. जीएसटीमुळे राज्याच्या हातात काही राहिलेले नाही आणि केंद्र सरकारने महाराष्ट्राचे करोडो रुपये थकवलेले आहेत. देशाच्या तिजोरात सर्वात जास्त पैसा मुंबई, महाराष्ट्रातून जातो पण केंद्र सरकार महाराष्ट्राला निधी देताना मात्र हात आखडता घेते, हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. केंद्र सरकारनेच इंधनावरील करातून २६ लाख कोटी रुपये कमावले आहेत आणि राज्य सरकारने कर कमी करावेत अशी अपेक्षा केंद्र सरकार व भाजपा करत आहे हे अत्यंत चुकीचे आहे, असेही प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com