Opposition Unity Meeting : भाजपच्या पोपटाचे विधान प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचे नाही : नाना पटोलेंचा पलटवार

ज्या लोकांना लोकशाही मान्य नाही, वारकऱ्यांवर लाठीमार करुन महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावले, त्यांच्याबद्दल काय बोलणार?
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Nana Patole On Bjp : पोपट काहीही बोलला की त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, त्यांचे विधान प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचेही नाही, अशा शब्दांत देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या पाटण्यातील बैठकीवर भाजपने केलेल्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले. (BJP's parrot's statement is not even worth reacting to : Nana Patole)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे आज धाराशिव आणि सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी सकाळी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. पाटण्यातील विरोधी पक्षातील नेत्यांच्या बैठकीवर भाजपकडून (BJP) टीका करण्यात आली हेाती. त्याला नाना पटोले यांनी उत्तर दिले आहे.

Nana Patole
Opposition Unity Meeting : पाटण्यातील विरोधकांच्या ऐकीच्या बैठकीने उद्धव ठाकरेंची केली कोंडी

प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले की, ज्या लोकांना लोकशाही मान्य नाही, वारकऱ्यांवर लाठीमार करुन महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावले, त्यांच्याबद्दल काय बोलणार? त्यांना जर लोकशाही मान्य असती, तर नवीन संसद भवनचे उद्‌घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले असते.

Nana Patole
Solapur Politic's : सोलापुरातील भाजप नेत्याच्या मुलीला BRS कडून लोकसभा उमेदवारीची ऑफर?

राज्यातील अनेक भागात अजून पेरण्या झालेल्या नाहीत. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. सरकारी मदत मिळत नाही, अन्नदाता बेहाल झाला असून आत्महत्या चारपटींनी वाढल्या आहेत. बळीराजावरील हे अस्मानी, सुलतानी संकट टळू दे, भरपूर पाऊस पडो, पीक भरघोस येवू दे आणि शेतकऱ्याच्या घरी आर्थिक संपदा येऊ दे. त्याचबरोबर देशावर व महाराष्ट्रावर आलेले भाजपाचे संकट दूर होऊन काँग्रेसची सत्ता येऊ दे, असे साकडे आई तुळजाभवानी चरणी घातल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

Nana Patole
Opposition Unity Meeting : केजरीवाल-अब्दुला आमने सामने; 'आप'ने अध्यादेशाचा विषय काढताच, अब्दुलांनी काढले ३७० कलम

पटोले म्हणाले की, कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाने देशात परिवर्तनाचे वारे वाहत असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजप ईडी, सीडी, सर्व यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. महाराष्ट्रातील आजचे राजकीय चित्र अत्यंत खालच्या पातळीवर गेले असून अशी परिस्थिती यापूर्वी कधीही नव्हती. विरोधकांवर दहशत निर्माण करण्यासाठी भाजप सरकारी यंत्रणांचा वारेमाप दुरुपयोग करत आहे. काँग्रेस सत्तेत येऊ नये यासाठी भाजपा मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार करत आहे. परंतु काँग्रेस सत्तेत यावी ही जनतेचीच इच्छा असून जनसमर्थन व तुळजाभवानीच्या आशीर्वादाने केंद्रात व राज्यात काँग्रेसच सत्तेत येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com