आदित्य ठाकरेंच्या दोन्ही हातातील घड्याळाचं गुपित काय? भाजपचं ट्विट अन् बरंच काही...

शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्याकडे आयकर विभागाने केलेल्या तपासात कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरी सापडली आहे.
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama

मुंबई : शिवसेना नेते यशवंत जाधव (Yasahwant Jadhav) यांच्याकडे आयकर विभागाने (Income Tax) केलेल्या तपासात कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरी सापडली आहे. डायरीतील एका नोंदीमध्ये मातोश्रीला 50 लाख रुपयांचे घड्याळ पाठवल्याचा उल्लेख आहे आणि दुसऱ्या नोंदीमध्ये गुढीपाडव्याला मातोश्रीला 2 कोटी रुपयांच्या भेटीचा उल्लेख आढळून आला आहे. त्यानंतर भाजपनं (BJP) केलेल्या ट्विटमुळं चर्चेला ऊत आला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या घराचे नावही मातोश्री असल्याने खळबळ उडाली आहे. त्यावरून भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपनं याबाबतच ट्विट करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) लक्ष्य केल्याची चर्चा आहे. याला कारणही तसंच मोठं आहे. त्यावरून आता पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना (Shiv Sena) आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

Aditya Thackeray
ज्योतिरादित्य शिंदेंचं पंतप्रधान मोदी अन् योगींना असंही गिफ्ट...

भाजपनं ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'योगायोग किती मोठा आहे! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंगल्याचे नाव देखील 'मातोश्री' आहे. दोन्ही हातात घड्याळ असते, याचं गुपित 50 लाख तर नाहीत?' या ट्विटमुळं चर्चेला उधाण आलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या दोन्ही हातात अनेकदा घड्याळ पाहायला मिळते. त्यामुळं भाजपने त्यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याची चर्चा आहे.

काय आहे प्रकरण?

यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने टाकलेल्या डायरीत त्यांच्या व्यवहारांच्या नोंदी असलेली डायरी सापडली आहे. त्यामध्ये मातोश्रीला 50 लाख रुपयांचे घड्याळ पाठवल्याचा उल्लेख आहे आणि दुसऱ्या नोंदीमध्ये गुढीपाडव्याला मातोश्रीला 2 कोटी रुपयांच्या भेटीचा उल्लेख आढळून आले आहे. डायरीत मातोश्रीच्या उल्लेखावरून चौकशी केली असता यशवंत जाधव यांनी हे घड्याळ त्यांच्या आईच्या वाढदिवसाला भेट दिल्याचे सांगितले. दुसरीकडे, गुढीपाडव्याला त्यांनी आईच्या स्मरणार्थ गरजूंना भेटवस्तू दिल्याचा खुलासा त्यांनी केला. मातोश्री म्हणजे आपली आई असल्याचे जाधव यांनी आयकर विभागाला सांगितले आहे. पण या उत्तरावर आयकर विभागाचे समाधान झाले नसल्याचेही समजते.

न्यूजस्टॉक कंपनीच्या व्यवहारांचीही चौकशी केली

या दोन संशयास्पद नोंदींव्यतिरिक्त, आयकर विभाग न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विविध व्यवहारांची चौकशी करत आहे. ठेकेदार बिमल अग्रवाल हे कंपनीचे मालक आहेत. बॉम्ब निकामी घोटाळा आणि सट्टेबाजीशी संबंधित प्रकरणांमध्ये पोलीस आणि अंमलबजावणी संचालनालयाने यापूर्वीच अग्रवालची चौकशी केली आहे.

BJP Tweet
BJP Tweet

यशवंत जाधवांच्या पत्नीचे शपथपत्राने पोलखोल

यशवंत जाधव यांनी बीएमसीच्या ३० कोटी रुपयांच्या विविध कंत्राटांसाठी बिमल अग्रवाल यांची मर्जी राखल्याचा आयकर विभागाला संशय आहे. जाधव यांच्या पत्नी आणि मुंबईतील भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांनी 2019 मध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. यात कोलकाता येथील प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून झालेल्या व्यवहाराची माहिती प्राप्तिकर विभागाला या शपथपत्रातून मिळाली होती. जाधव आणि कुटुंबीयांना भायखळा येथील इमारत खरेदीसाठी सुमारे १५ कोटी रुपये कंपनीने दिले होते. जाधव कुटुंबीयांनी नंतर हे पैसे कंपनीला परत केले, जे नंतर कंपनीने न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे हस्तांतरित केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com