Nora Fatehi : मनी लाँड्रिंग प्रकरणी नोरा फतेही अडचणीत : जॅकलिनच्या आरोपानंतर सहा तास चौकशी

Nora Fatehi हीला 50 प्रश्न विचारण्यात आले होते. यात सुकेशकडून भेटवस्तू कधी घेतल्या? तू त्याला कुठे भेटली? असे काही प्रश्न होते.
Nora Fatehi
Nora Fatehisarkarnama
Published on
Updated on

मुंबई : तिहार तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेही (nora fatehi) हीची दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) चौकशी केली आहे. (nora fatehi latest news)

दोनशे कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी सुकेश चंद्रशेखरने नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांना आलिशान कारसह अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या, असे ईडीच्या तपासात आढळले आहे.

नोरा फतेही हीची काल (शुक्रवारी) चौथ्यांदा चौकशी करण्यात आली. तब्बल सहा तास पोलिसांनी नोराची कसून चौकशी केली. तिला 50 प्रश्न विचारण्यात आले होते. यात सुकेशकडून भेटवस्तू कधी घेतल्या? तू त्याला कुठे भेटली? असे काही प्रश्न होते. संपूर्ण चौकशीत नोराने पोलिसांना सहकार्य केल्याचे समजते.

याप्रकरणी तीन दिवसापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या हिला समन्स बजावले आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी जॅकलिन फर्नांडिसला २६ सप्टेंबर रोजी दिल्लीच्या पतियाळा न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.

Nora Fatehi
Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्याबाबत अजित पवारांचे सूचक व्यक्तव्य

ईडीनं दाखल केलेल्याआरोपपत्रानंतर तिला समन्स बजावला आहे, आरोपपत्रात जॅकलिन फर्नांडिसचे नाव असल्याने न्यायालयाने समन्समध्ये म्हटलं आहे. आर्थिक गैरव्यवहाराचा सूत्रधार सुकेश चंद्रशेखर याच्यासमवेत कसे संबंध होते आणि २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक गैरव्यवहारात आपली भूमिका होती हे जॅकलीन हिला न्यायालयाला सांगावे लागणार आहे.

याप्रकरणी नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्राचीही (Supplementary ChargeSheet) न्यायालयाने दखल घेतली आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात नवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिनला घोडा, मांजरी आणि दागिनेच भेट दिल्याचे आपल्याला माहिती आहे, पण सुकेश याने तिच्यासाठी श्रीलंकेत घरही खरेदी केले होते, अशी माहिती समोर आली आहे. सुकेशविरोधात खटला सुरू आहे.

सुकेश चंद्रशेखरविरुद्ध दिल्ली न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे आरोपी म्हणून नाव दिले आहे. याप्रकरणावर काही दिवसांपूर्वी जॅकलिनने मौन सोडले होते. ‘सुकेश चंद्रशेखरकडून भेटवस्तू स्वीकारणाऱ्या सेलिब्रिटींना साक्षीदार बनवले आहे. तर मला आरोपी केले आहे’, असे जॅकलिनने म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com