Bomb blast threat in Mumbai : गेल्या काही महिन्यांपासून धमक्यांचे सत्र वाढल्याचे दिसत आहे. मुंबई आणि पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला गुरुवारी (२२ जून) सकाळी धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. या फोननंतर राज्यात मुंबई पोलिस (Mumbai Police) आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हा फोन नेमका कोणी आणि कुठून केला, याचा तपास करत आहेत.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ' गुरुवारी सकाळी 10 वाजता पोलीस कंट्रोलला कॉल आला होता. 24 जून रोजी संध्याकाळी 6:30 वाजता मुंबईतील अंधेरी आणि कुर्ला या परिसरात बॉम्बस्फोट होणार असल्याचं सांगण्यात आलं. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ''आपल्याला दोन लाख रुपयांची अत्यंत गरज आहे असून ही रक्कम मिळाली तर बॉम्बस्फोट थांबवू शकतो. असा दावाही संबंधित कॉलरने (Threat Call) केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
आपण स्वत: हा बॉम्बस्फोट घडवून आणणार असून त्यासाठी आपल्याला दोन कोटी रुपये मिळाल्याचंही त्याने सांगितलं आहे. दोन लाख रुपये मिळाल्यास आपण आपल्या लोकांसोबत त मलेशियाला निघून जाऊ, असाही दावा धमकी देणाऱ्याने केला आहे. पण या कॉलनंतर एकच खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)
या फोनप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असता कॉलरने हा फोन उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी धमकी देणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून ते या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, मुंबई ते दिल्ली या विमान प्रवासा दरम्यान दहशत पसरवू पाहणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती फोनवर दुसऱ्या व्यक्तीशी विमान हायजॅक करण्याची वल्गना करत होता. विमानात दहशत पसरवू पाहणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेला संबंधित तरुण हा मूळचा हरियाणाचा असून तो दिल्ली ते मुंबई विस्तारा या कंपनीच्या विमानातून प्रवास करत होता.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.