Budget Session : मुख्यमंत्री दौऱ्यांमध्येच मग्न: मंत्रालयात तीन हजार फायलींचा ढीग; अजित पवारांचा आरोप !

Ajit Pawar : राज्याची कायदा सुव्यस्था बिघडली, अजित पवारांचा हल्लाबोल..
Budget Session : Ajit Pawar : Eknath Shinde
Budget Session : Ajit Pawar : Eknath ShindeSarkarnama

Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विधीमंडळ दालनात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घऊन शेतकऱ्यांचे प्रश्न, राज्याची कायदा सुव्यवस्था, निवडणूक आयोग, शिवसेना पक्ष चिन्हाचा निर्णय इत्यादी मुद्द्यांवर त्यांनी सरकारला धारेवर धरले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर ही पवारांना जोरदार हल्लाबोल केला.

अजित पवार म्हणाले, "एकीकडे मुख्यमंत्री वारंवार स्वत:ला सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणवून घेतात, पण दुसरीकडे सर्वसामान्यांशी संबंधित सुमारे तीन हजार फायली मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात धूळ खात आहेत. या तीन हजार फायलींवर सही करायला मुख्यमंत्र्यांना वेळच मिळत नाही. सध्या पुण्यात लागलेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचार आणि इतर काही कामांमध्ये मुख्यमंत्री इतके व्यस्त आहेत की, मुख्यमंत्री स्वत:ची जबाबदारी विसरले आहेत," अशा शब्दात अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला.

Budget Session : Ajit Pawar : Eknath Shinde
Budget : विरोधक सरकारला घेरणार?; अर्थसंकल्पीय अधिवेशनात 'हे' मुद्दे गाजणार!

पवार पुढे म्हणाले, "आमच्याशी एका शेतकऱ्याने संपर्क साधला, सोलापुरातील शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी ५१२ किलो कांदा विकल्यानंतर या शेतकऱ्याला २ रूपयांचा चेक मिळाला आहे. हे दुर्दैव आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही शोकांतिका आहे. राज्यकर्ते कोणीही असो, अशी वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये.कांदा निर्यात करण्यासाठी ताबडतोब पावले उचलायला हवी. यामुळे शेतकऱ्यांच्या कांदाला भाव मिळेल. आज मागणी आणि पुरवठा याचा ताळमेळ बसत नाही."

Budget Session : Ajit Pawar : Eknath Shinde
Ajit Pawar : "शिवसेना पक्ष-चिन्हाबाबत आयोगाचा निर्णय पक्षपाती असल्याची जनभावना!"

राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले, ते म्हणाले, "राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर बनलेली आहे. प्रज्ञा ताई सातव यांच्यावर हल्ला झाला, जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबाना धमकी देण्यात आली. आदित्य ठाकरे यांच्या रॅलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवली जात आहे, संजय राऊत यांना मारण्याची सुपारी देण्याचा आरोप झाला. ठाणे जिल्ह्यात काल पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली, त्यात एकाचा मृत्यू झाली, हे प्रकरण गंभीर नाही का ?' असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com