मुंबई : शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर (Sujit Patkar) यांच्यावर 38 कोटींची फसवणूक (Lifeline Hospital 38 crore fraud) करुन गैरव्यवहार केल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. Sujit Patkar
राऊत यांच्या अटकेनंतर आता त्यांचे मित्रही रडारवर असल्याचे चित्र आहे. राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणाऱ्या सुजित पाटकर यांच्या अडचणीत आता वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये 38 कोटींची फसवणूक केल्याचे तक्रारदार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.सुजित पाटकर यांच्यासह अन्य काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जम्बो कोविड सेंटर प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुजित पाटकर यांच्याविषयी तक्रार करत कारवाई केली जात नसल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी केली आहे. बनावट कागदपत्र सादर करून जम्बो कोविड सेंटरमधील वैद्यकीय सेवा पुरवण्याबाबतचे कंत्राट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप पाटकर यांच्यावर आहे.
सुजित पाटकर यांच्यासह लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंटचे भागीदार डॉ. हेमंत गुप्ता,संजय शहा आणि राजू साळुंखे यांच्यावरही 38 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जून 2020 ते मार्च 2022 या कालावधीत लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस फर्म व फर्मचे भागीदार हेमंत रामशरण गुप्ता, सुजित मुकुंद पाटकर, संजय मदनलाल शहा आणि राजू साळुंखे यांनी मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील वेगवेगळ्या जंबो कोव्हिड सेंटरला वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी काढलेल्या बिडस मिळविण्यासाठी यांनी फर्मचे 26 जून 2020 रोजीचे बनावट व खोटे पार्टनरशीप तयार केली. ही पार्टनरशी खोटे व बनावट असल्याचे माहिती असतानाही त्यांनी ही कागदपत्रं सादर केली आहेत, असे किरीट सोमय्या यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.