बावनकुळे यांचे थेट सोनिया गांधींना पत्र; बड्या नेत्याची तक्रार अन् केली मोठी मागणी

नाना पटोले यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांना पदावरून तातडीने हटवावे, अशी विनंती बावनकुळे यांनी केली आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मागील काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) सातत्याने चर्चेत आहेत. गावगुंड मोदीवरून तर राज्यातील राजकारण ढवळून निघालं. त्यानंतर महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरूनही वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर आता भाजपचे (BJP) नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी थेट काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहित त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

बावनकुळे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नाना पटोले हे सातत्याने समाजविघातक वक्तव्य करत आहेत. त्यामुळे सामाजिक शांतता बिघडत आहे. काँग्रेससोबत आमचे राजकीय, वैचारिक मतभेद असले तरी राष्ट्रहितासाठी सर्व मतभेद बाजूला ठेवून आपण एकत्रित यावे, हा आपल्या लोकशाहीचा संस्कार आहे. त्यात भावनेतून हे पत्र लिहित असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केलं आहे.

Chandrashekhar Bawankule
निवडणुका तर होतच राहतील पण...! पंतप्रधान मोदींनी केली खासदारांना विनंती

अलीकडे नाना पटोले यांनी दोनदा वादग्रस्त वकत्व्य केल्याने समाजमन संतप्त झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान त्यांनी केला. त्यावरून पटोलेंचा सर्व क्षेत्रातून तीव्र निषेध करण्यात आला. तर महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येचा 'वध' असा उल्लेख केला. वध हा राक्षसांचा होतो, महापुरूषांचे नव्हे. ही सामान्य बाब जबाबदार व्यक्तीला समजू नये, ही खेदाची बाब आहे, अशी तक्रार बावनकुळे यांनी पत्रात केली आहे.

नाना पटोले यांनी दोन्ही अवमानकारक वक्तव्यांबद्दल माफी मागितली आहे. काँग्रेस हा देशातील जुना पक्ष आहे. या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष महात्मा गांधी आणि पंतप्रधान मोदी यांचा अपमान करतो. तर काँग्रेसकडून ही विकृती खपवून घेतली जाते, ही बाब खटकणारी आहे. अशा बेजबाबदार व्यक्तीवर कठोर कारवाई करावी आणि त्यांना पदावरून तातडीने हटवावे, अशी विनंती बावनकुळे यांनी केली आहे.

पटोले हे मिस्टर नटवरलाल

पंतप्रधान मोदी यांच्याविषयी पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावरून बानवकुळे यांनी त्यांच्यावर याआधाही जोरदार टीका केली आहे. नाना पटोलेंबद्दल तर बोलायलाच नको.. कारण ते इतके खोटारडे आहेत, की यापुढे त्यांना महाराष्ट्र मिस्टर नटवरलाल या नावानेच ओळखेल.पंतप्रधानांबाबत पटोले यांनी जे वक्तव्य केले, ते शेंबड्या पोरालाही ऐकविले तरी ते वक्तव्य पंतप्रधान मोदींबद्दल आहे, असे तो सांगेल. सतत खोटे बोलणे आणि फसवणूक करणे हा नानांचा स्वभाव आहे. म्हणून मी त्यांना मिस्टर नटवरलाल म्हणणार आहे आणि महाराष्ट्रसुद्धा त्यांना याच नावाने ओळखेल, असं बावनकुळे म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com