Chandrashekhar Bawankule : 'कॅसिनो' प्रकरणी आरोपावर बावनकुळेंची प्रथमच माध्यमांना प्रतिक्रिया, म्हणाले...

Bawankule Vs Raut : ''...आणि आता पुढे एक वर्ष घरी जाणार नाही.'' असंही बावनकुळे म्हणाले आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना(उबाठा) खासदार संजय राऊत यांनी नुकतच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ येथील कॅसिनोमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यावरून बावनकुळे हे जुगार खेळत असल्याचं राऊत म्हणाले होते. या फोटोची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली, शिवाय भाजपा आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले.

शिवाय सोशल मीडियावरही हा चांगलाच व्हायरल होऊन त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. या सगळ्या घडामोडीनंतर अखेर आज बावनकुळे हे स्वत: प्रसारमाध्यमांसमोर याबाबत बोलले.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ''फोटोच्या आधारावर कोणाची प्रतिमा मलीन करता येत नाही. खरंतर मी मागील ३४ वर्षांपासून राजकीय, सामाजिक, सार्वजनिक जीवनात आहे. मी भाजपा-शिवसेना युतीचंही अनेक वर्ष काम केलं आहे. चार-चारदा आम्ही मतदारसंघात निवडून आलो आहोत. मोठ्याप्रमाणावर आम्ही संघर्ष करून, ३४ वर्षे काम करून आम्ही प्रतीमा तयार केली आहे. त्यामुळे जर कोणी असा प्रयत्न केलाही असेल, तर त्यांचा प्रयत्न त्यांना लखलाभ.''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याशिवाय ''१४ महिन्यांपासून मी आठवड्यातून किंवा महिन्यातून एका दिवसासाठी घरीच जातो आणि पुढे एक वर्ष घरी जाणार नाही. त्यामुळे माझी मुलगी, सून आणि कुटुंबीयांनी तीन दिवसांचा वेळ माझ्याकडून घेतला आणि त्यांनी टूरचे नियोजन केले, हाँगकाँग- मकाऊ या पर्यटनस्थळी आम्ही गेलो, अत्यंत सगळं चांगलं सुरू असताना, व्यक्तिगत जीवनात ज्यापद्धतीने आमच्या कुटुंबाला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न झाला.

ज्यामुळे थोडं दु:खही वाटलं, राजकारणात काम करत असताना अशा पद्धतीचे प्रयत्न होणेही चुकीचे वाटले. माझ्या कुटुंबाला आणि मला वाईट वाटलं. परंतु ठीक आहे, हा राजकारणाचा भाग आहे. हाँगकाँग-मकाऊमध्ये कुठल्याही हॉटेलमध्ये गेलात आणि हॉटेलच्या कुठल्याही भागातून जात असताना कॅसिनो टेबल पार करूनच जावे लागतात.''

Chandrashekhar Bawankule
Kalamkar Vs Jagtap : ''...तर मग कोट्यवधी रुपये मुरले कुठे?'' अभिषेक कळमकरांचा आमदार जगतापांना सवाल!

याशिवाय ''हे जे साडेतीन कोटी रुपये उडवल्याचं बोलत आहेत, तर असा काळ आहे की, एक लाख रुपये जरी तुमच्या बॅगेत असतील तरी तीन-तीनदा तुमची तपासणी होते. हाँगकाँगला माझा मोठा मित्र आहे, अनेक बँक खाती आहेत, असं दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र माझा तसा कोणताही मित्र नाही आणि माझे परदेशात कोणतेही बँक खाते नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com