Ashok Chavan News : मुंबईतील 'इंडिया'च्या बैठकीची अशोक चव्हाणांवर विशेष जबाबदारी

Ashok Chavan, Mallikarjun Kharge News : मुंबईमध्ये विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीची बैठक होणार आहे.
Ashok Chavan News
Ashok Chavan NewsSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : मुंबईमध्ये विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीच्या नियोजनाची जोरदार तयारी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांची भेट घेतली. येत्या ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीची पूर्वतयारीबाबत खर्गे यांच्याशी चर्चा झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

खर्गे यांच्या संसद भवनातील कार्यालयात झालेल्या बैठकीला महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेनेचे (Shivsena) नेते खासदार संजय राऊत, माजी मंत्री नसीम खान, खासदार अनिल देसाई देखील उपस्थित होते. 'इंडिया'च्या बैठकीच्या नियोजन समितीत काँग्रेस पक्षाने समन्वयक म्हणून अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Ashok Chavan News
Shasan Aplya Dari: डोळ्यांच्या साथीमुळे आरोग्य विभाग म्हणते गर्दी टाळा; दुसरीकडे 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम जोरात

या भेटीची माहिती देताना चव्हाण म्हणाले, काँग्रेस (Congress) अध्यक्षांना मुंबईतील बैठकीच्या पूर्वतयारीबाबत माहिती देण्यात आली. नियोजनाचा आढावा घेतल्यानंतर खर्गे यांनीही काही सूचना दिल्या व मार्गदर्शन केले. पाटणा व बंगळुरू येथे यापूर्वी 'इंडिया'च्या बैठकी झाल्या असून, मुंबईतील बैठकीच्या आयोजनाची जबाबदारी महाविकास आघाडी म्हणून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी संयुक्तपणे स्वीकारली आहे.

वडेट्टीवार म्हणाले, मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील काही पक्ष आमच्या सोबत येतील त्यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. राज्यात ओबीसी मेळावा नागपूरला व्हावा अशी विनंती मी पक्षाकडे करणार आहे. ओबीसी जातनिहाय जनगणना महाराष्ट्रात सुरू झाली पाहीजे. राज्यात ओबीसींची किती संख्या आहे, याची आकडेवारी पुढे आली पाहीजे. जिल्हास्तरावर मोर्चा आणि आंदोलन उभी करणार आहे.

Ashok Chavan News
Pune Municipal Medical College : पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये वीस कोटींच्या 'वसुली'चे इंजेक्शन !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महाविकास आघाडी सोबतच आहेत. राष्ट्रवादीचे नेते गेले तरी जनता पवार साहेबांसोबत आहे. त्याच प्रमाणे शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले तरी जनता मात्र, उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com