Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange : जरांगेंनी आपली ताकद दाखवूनच द्यावी; भुजबळांचं चॅलेंज

Maratha Reservation : लोकशाहीत कुणीही निवडणूक लढवू शकते. त्यामुळे मनोज जरांगेंनी राज्यातील 288 जागा लढवाव्यात.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : मराठा आरक्षणासाठी सगेसोयऱ्यांची अमंलबजावणी करण्यासाठी आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला महिन्याची मुदत दिली आहे. या कालावधीत सरकारने ठोस पावले उचलून योग्य निर्णय घेतला नाही तर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जरांगेंनी जाहीर केले आहे. जरांगेंच्या भूमिकेचे ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळांनी स्वागत केले आहे. त्यांनी राज्यातील सर्व 288 जागा लढवाव्यात, असे खुले चॅलेंजही दिले आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल येताच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj Jarange यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले. त्यांनी सरकारने 10 टक्के दिलेले आरक्षण नाकारत सगेसोगऱ्यांची मागणी लावून धरली. तसेच आंदोलनादरम्यान दाखल झालेले मराठ्यांवरील गुन्हे मागे घेण्यावरही ते ठाम आहेत.

यावर तोडगा काढण्यासाठी सरकारच्या वतीने मंत्री शंभूराज देसाईंनी महिन्याचा वेळ मागितला आहे. त्यानुसार जरांगेंनी आपले आंदोलन स्थगित केले आहे. मात्र महिन्यात उपाययोजना झाली नाही तर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, तसेच नाव सांगून सत्ताधाऱ्यांचे आमदार पाडणार, असा इशाराच त्यांनी दिला.

Chhagan Bhujbal
Suresh Mhatre : कपिल पाटलांचा भिवंडीत दंगल घडवण्याचा डाव; बाळ्या मामांचा खळबळजनक आरोप

यावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना छगन भुजबळांनी Chhagan Bhujbal त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले. ते म्हणाले, लोकशाहीत कुणीही निवडणूक लढवू शकते. त्यामुळे मनोज जरांगेंनी राज्यातील 288 जागा लढवाव्यात. मराठा आंदोलनाचा मराठवाड्यातील तीन-चार जागा सोडल्या तर जास्त प्रभाव दिसला नाही. विदर्भात कुठे आंदोलनाने फरक पडला. तसे असते तर पश्चिम महाराष्ट्रातील शिरूरमध्ये अमोल कोल्हे निवडून आले नसते, याकडेही भुजबळांनी लक्ष वेधले.

लोकसभा निवडणुकीत भाजपसह सत्ताधारी पक्षांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची नाराजी, कांदा प्रश्न, संविधान बदलाचा अपप्रचार केल्याची कारणे सांगितली जात आहेत. मात्र मराठा आंदोलनाचाही सत्ताधारी पक्षांना मराठवाड्यात फटका बसल्याचे बोलले जाते. मराठवाड्यातील बीड, जालना या मतदारसंघात मराठा आंदोलनाचा मोठा फटका बसल्याची चर्चा आहे.

Chhagan Bhujbal
Phaltan Politics : 'आता फलटणचा आमदार बदलायचाय...'; ठाकरे गटाकडून जोरदार मोहीम

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com