Silver Oak Attack : या जन्माच इथेच फेडावं लागतं : छत्रपती उदयनराजेंकडून हल्ल्याचे समर्थन

Sharad Pawar | chhtrapati Udyanraje | Satara : शरद पवार यांच्या निवासस्थानी संतप्त एसटी कर्मचाऱ्यांचा दगड आणि चपला भिरकवत हल्ला
Sharad Pawar | chhtrapati Udyanraje
Sharad Pawar | chhtrapati Udyanraje Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचारी आंदोलनाने काल दुपारी नवे वळण घेतले. न्यायालयाच्या आदेशानंतरही संतप्त एस.टी. कामगारांनी विलीनीकरणाची मागणी करत काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver Oak) या निवासस्थानावर हल्ला केला. यावेळी आक्रमक आंदोलकांनी पवारांच्या घरावर दगडं आणि चपला भिरकावल्या. शरद पवारांमुळे हे सरकार अस्तित्वात आले आणि सरकारला हलवायचे असेल तर, पवारांना लक्ष्य करावे लागेल, असा पवित्रा या आंदोलकांनी घेतला.

त्यानंतर राज्यभर त्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला. तर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या हल्लाचा निषेध केला. मात्र भाजपच्या अन्य काही नेत्यांकडून मात्र या हल्ल्याचे समर्थन करण्यात येत आहे. या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्याचे माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी शरद पवारांचे (Sharad Pawar) शेवटचे दिवस वाईट सुरू झाले आहेत. फ्रान्सच्या राज्यक्रांतीमध्ये राजाला शेतकऱ्यांनी, कामगारांनी भर चौकात आणून फाशी दिली होती. त्याचीच थोडीफार प्रमाणात पुनरावृत्ती महाराष्ट्रात (Maharashtra) पहायला मिळाली. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

त्यानंतर "या जन्मी केलेलं इथेच फेडावं लागतं" असे म्हणतं छत्रपती खासदार उदयनराजे यांनी शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, बरोबर, झालंच पाहिजे होते, अजून दगड मारायला हवी होती? असचं ना? पण नाही. फार छोटा विचार आहे. आता तुम्हाला कितपत माहित आहे ते मला माहित नाही. पण जे कर्म असते ना कर्म, जे आपण या जन्मी करतो, प्रत्येक जणाला, मला लागू होते, तुम्हाला, सर्वांना लागू होते. याला अपवाद नसतो. ते कोणत्या ना कोणत्या पद्धतीने फेडावेच लागते. अजून काय बोलणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com