Vinayak Mete : मराठा समाजाचा बुलंद आवाज हरपला : मुख्यमंत्री शिंदेंकडून मेटेंना श्रद्धांजली

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मी आजच (ता. १४ ऑगस्ट) मुंबई येथे बैठक बोलावली होती. मेटे त्या बैठकीलाच उपस्थित राहणार होते. पण, या बैठकीपूर्वीच काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले.
Vinayak Mete
Vinayak MeteSarkarnama

मुंबई : माजी आमदार आणि शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे अपघाती मृत्यू अत्यंत धक्कादायक आणि वेदना देणारे आहे. मेटे यांच्या निधनामुळे मराठा आरक्षणासह, सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचे नेतृत्व हरपले, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मेटे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली. (Chief Minister Eknath Shinde expressed grief over the accidental death of Vinayak Mete)

Vinayak Mete
डोक्याला मार, डोळ्यांची हालचाल नाही...अशी होती हॉस्पिटलमध्ये आणल्यावर मेटेंची अवस्था

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मी आजच (ता. १४ ऑगस्ट) मुंबई येथे बैठक बोलावली होती. मेटे त्या बैठकीलाच आज उपस्थित राहणार होते. पण, या बैठकीपूर्वीच काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले आहे. त्यांच्या निधनाने मराठा आरक्षण चळवळीचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. ते अरबी समुद्रातील शिवस्मारक आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तळमळीने बोलायचे. या स्मारकाच्या कामासाठी राजकीय इच्छाशक्ती निर्माण करून निधीची तरतूद करून घेण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

Vinayak Mete
Vinayak Mete| शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन

मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात जीव गमवावा लागलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना शासकीय नोकरी मिळावी, त्यांचं योग्य पुनर्वसन व्हावं, तसेच आंदोलन करताना दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, गरीब लोकांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी ते कायम लढत राहिले. मेटे यांच्या निधनाने मराठा समाजाचा एक बुलंद आवाज आज हरपला आहे. या धक्क्यातून सावरण्याचे बळ मेटे कुटुंबीयांना मिळो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना. माजी आमदार विनायक मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com