CM Shinde : रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीसाठी धावले खुद्द मुख्यमंत्री शिंदे!

Eknath Shinde helped a woman : ताफ्यातील पोलिसांची गाडी सोबत देऊन जखमी महिलेला पोहचवले रुग्णालयात
CM Shinde
CM ShindeSarkarnama

Thane Road Accident News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय सोमवारी पुन्हा एकदा पहायला मिळाला. कळवा पुलावर रिक्षा उलटून जखमी झालेल्या एका महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री स्वतः धावून गेले.

आज 20 मे रोजी ठाणे शहरात सगळीकडे उत्साहात मतदान पार पडत आहे. सकाळी स्वतः कुटुंबासोबत मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे(Eknath Shinde) हे ठाणे शहरात ठिकठिकाणी फिरून झालेल्या मतदानाचा आढावा घेत होते. सकाळी ठाणे आणि त्यानंतर मीरा भाईंदर येथील मतदानाचा आढावा घेतल्यानंतर त्यांचा ताफा कळव्याकडे निघाला. कळवा पुलावरून जात असताना अचानक त्याना एक रिक्षा रस्त्यावर उलटल्याचे दिसले. या अपघातात रिक्षातून प्रवास करणारी महिला जखमी झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

CM Shinde
Thane Election Voting LIVE: बोगस मतदानासाठी लोक आणून ठेवलेत; ठाकरे गटाचे उमेदवार भडकले

यावर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ आपला ताफा थांबवला आणि ते या जखमी महिलेच्या मदतीला धावून गेले. या महिलेने त्यांना आपल्या डोक्याला मार बसल्याने गरगरत असल्याचे सांगितले. त्यावर शिंदे यांनी तत्काळ त्यांना आपल्या गाडीतून पाणी आणून दिले. तसेच पुढील उपचारासाठी आपल्या ताफ्यातील पोलीस वाहन देऊ करून या महिलेला कळवा रुग्णालयात दाखल करायला सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी तत्काळ उतरून आपल्याला मदत केल्याबद्दल या महिलेने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तर मतदानाच्या दिवशीही जनतेची काळजी घेणाऱ्या संवेदनशील मनाचा मुख्यमंत्री यानिमित्ताने पुन्हा एकदा ठाणेकरांना अनुभवायला मिळाला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

CM Shinde
Mumbai North Central Lok Sabha Election : उद्धव ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क, मुख्यमंत्री शिंदे म्हणतात 'आजचा काळा दिवस...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com