Maratha Reservation : मराठा आरक्षणाची याचिका फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री ‘अ‍ॅक्शन मोड’ मध्ये; बोलावली तातडीची बैठक

CM Eknath Shinde : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईची पुढील दिशा ठरली जाण्याची शक्यता...
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde Sarkarnama

Mumbai : सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची मराठा आरक्षणासंदर्भात पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. त्यामुळे राज्य सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. मात्र, या निर्णयामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी सह्याद्री अतिथीगृहावर शुक्रवारी (दि.२१) दुपारी १ वाजता ही बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला मंत्री उदय सांमत, शंभूराज देसाईंसह इतर मंत्रीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईची पुढील दिशा ठरली जाण्याची शक्यता आहे.

CM Eknath Shinde
Breaking News : राहुल गांधी,योगी आदित्यनाथ,अजित पवार यांच्या अकाऊंटवरुन ब्लू टिक हटवली; काय आहे कारण?

राज्य शासनातर्फे जून 2021 मध्ये मराठा आरक्षण(Maratha Reservation) पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली होती. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचे सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. त्यासाठी लागेल ते करू अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री अलर्ट मोडवर असून सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. मराठा आरक्षण समितीतील महत्त्वाचे नेते आणि काही मंत्र्यांना देखील तातडीने मुंबईत बोलावल्याची माहिती मिळत आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मुद्द्यावर संपूर्ण आढावा घेणार आहेत.

CM Eknath Shinde
Rahul Gandhi on PM Narendra Modi; देशातील संपत्ती एकाच व्यक्तीला का? अदानींवरुन राहुल गांधींचा पंतप्रधानांना सवाल

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तत्कालीन उध्दव ठाकरे सरकारला जबाबदार धरत न्या. भोसले कमिटीनं फेरविचार याचिकेमध्ये कोणताही स्कोप नसल्याचं म्हटलं होतं असं म्हटलं आहे. तरी देखील ठाकरे सरकारने याचिका का दाखल केली होती? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी मविआवर निशाणा साधला आहे.

CM Eknath Shinde
Maratha Reservation : मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली!

तसेच राज्य शासनातर्फे जून 2021 मध्ये मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली होती. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचे सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. त्यासाठी लागेल ते करू. भोसले समितीने दिलेल्या सूचनांवर आम्ही काम करत असल्याची प्रतिक्रियाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com