Badlapur School Case : बदलापूर अत्याचाराच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय; खटला जलदगतीने चालवण्याबरोबर राज्यातील शाळांना...

Chief Minister Eknath Shinde took serious notice of the atrocities in Badlapur Mumbai : दोन चिमुरड्यांवरील अत्याचाराविरोधात पालकांनी मुंबईतील बदलापूर इथं बंद पुकारला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची दखल घेत प्रशासनाला खटला जलदगतीने चालवण्याचा आदेश दिला आहे.
Eknath Shinde On Badlapur Bandh
Eknath Shinde On Badlapur BandhSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : चार वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत बदलापूरमध्ये संतापाचा लाट उसळली असून, बदलापूरमधील नागरिकांनी शाळेसमोर सकाळपासून आंदोलन सुरू केले आहे. याशिवाय बदलापूरमध्ये 'रेल रोको' केला. त्यामुळे गेल्या दोन तासांपासून रेल्वे वाहतूक कोलमडली आहे.

पालकांच्या या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून, या संवेदनशील घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याच्या सूचना प्रशासनला दिल्याचे सांगितले. तसंच राज्यातील शाळांमध्ये अशा घटना रोखण्यासाठी कडक नियमावली तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

बदलापुरामधील एका नामांकित शाळेत दोन शाळकरी मुलींवर अत्याचार झाला. या घटनेत पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल करून घेण्यास दिरंगाई केली. त्यामुळे पालकांमध्ये शाळाप्रशासनासह पोलिसांविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेधार्थ आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. तसंच पालकांनी 'रेल रोको' आंदोलन देखील केला आहे. रस्त्यावर उतरलेला पालकांच्या भावना तीव्र आहे. या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून देखील निषेध सुरू आहे.

Eknath Shinde On Badlapur Bandh
Sanjay Raut On Devendra Fadnavis : मलिकांबाबत लिहिलेले राष्ट्रभक्तीचे 'डॉक्युमेंट' पाठवून देऊ का? संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

आरोपींना अटक : मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती

या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतली असून, घटनेची संवेदनशील खूप मोठी आहे. त्यामुळे प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात आहे. पोलिस आयुक्तांशी चर्चा केली असून, त्यांनी आरोपींना अटक केल्याची माहिती दिली. या घटनेत कायद्यातील प्रत्येक तरतुदींनुसार कारवाई करण्याची सूचना दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Eknath Shinde On Badlapur Bandh
Aditya Thackeray : काळे झेंडे दाखवले, 'फेल इंजिन'; आदित्य ठाकरेंचा महायुतीला जोराचा चिमटा

शाळेच्या संस्थाचालकांची चौकशी

बदलापूरमध्ये ज्या शाळेत ही घटना झाली आहे, त्या शाळेच्या संस्थाचालकांच्या चौकशीचा आदेश दिला आहे. या कर्मचाऱ्यांना शाळेत कोणी नोकरीवर ठेवले, याची देखील चौकशी होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबईसह महाराष्ट्रातील कोणत्याही शाळेत अशी घटना घडू नये म्हणून, कडक नियमावली तयार करणार आहोत. बदलापूरमधील या घटनेतील पीडित कुटुंबाला संपूर्ण न्याय मिळेपर्यंत या खटल्याचा पाठपुरावा करत राहणार असून, पालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदेंनी केला.

शाळांना कडक नियमावली

"आपण एक परिवार आहोत. भविष्यात महाराष्ट्रातील कोणत्याच शाळेत अशा घटना घडणार नाही, अशी कडक नियमावली तयार करणार आहोत. यासाठी शाळेतील प्रत्येक कर्मचाऱ्याची पार्श्वभूमी तपासली जाईल, असे नियम तयार केले जातील", असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

आरोपांनी फाशीची शिक्षा द्या

या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी बदलापूरकर रस्त्यावर उतरले आहेत. आरोपींना फाशी देण्याचा मागणी करत आहेत. शाळेभोवती जमलेले पालक चांगलेच आक्रमक झालेत. शाळेचे प्रवेशद्वार तोडण्याचा प्रयत्न देखील संतप्त पालकांनी केला. लाडकी बहीण करण्यापेक्षा महिलांना, मुलींना सुरक्षा द्या, अशी मागणी आंदोलनातील पालकांनी केली आहे. बदलापूरमध्ये पालक आणि नागरिकांचे या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सकाळी साडेदहा वाजल्यापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात संतप्त झालेल्या पालकांच्या भावनाचे हादरले राज्य सरकारला बसले असून, त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी देखील संतप्त प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com