Eknath Shinde News : २०२४ च्या लोकसभेची हंडी मोदीच फोडतील ; मुख्यमंत्री शिंदेंचा विश्वास

Thane Dahihandi News : राज्यात आता अहंकाराचे थर कोसळले असून विकासाचे थर रचले जात आहेत.
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Thane News : राज्यात आता अहंकाराचे थर कोसळले असून विकासाचे थर रचले जात आहेत. देशात राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येत असले. तरी त्याचा काहीही परिणाम होणार नसून २०२४ च्या लोकसभेची हंडी हे मोदीच फोडतील, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. ठाण्यातील टेंभी नाक्यावरील दिघे साहेबांच्या दहीहंडीला शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी बोलतांना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.

दहीहंडीला वरून राजाही प्रसन्न झाल्याने मुंबईत तसेच ठाण्यात गोविंदाचा उत्साह शिगेला पोचला आहे. खरे म्हणजे ठाणे हे गोविंदांची पंढरी असल्याचे त्यांनी सांगितले. धर्मवीर आनंद दिघें यांनी हा उत्सव सुरु केला आणि संपूर्ण महाराष्ट्रात तो साजरा केल्या जाऊ लागला. आनंद दिघेंच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो. त्यामुळे आपण राज्यात चांगले काम करत आहोत. कोरोना काळात लावण्यात आलेली सर्व नियम, बंधने काढून टाकली, गणपती उत्सवावरील वरील सर्व बंधने काढून टाकली, यावर्षी आणखी जोरदार उत्सव साजरे करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. थर लावताना प्रत्येकाचा जीव महत्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

Eknath Shinde News
PCMC News : मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता वाढली ; आता अंतरवाली सराटीनंतर पिंपरीतही बेमुदत उपोषण

सरकारने यावेळी प्रो गोविंदा घेऊन साहसी खेळात याचा समावेश केला आहे. गोविंदाची सुट्टी पण जाहीर केली. १० लाखांचा विमा देखील काढला. त्यामुळे सांघिक भावनेने उत्सव साजरा करून या उत्सवाला गालबोट लागता कामनये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. थर लावताना प्रत्येकाने काळजी घ्यावी, तुमचा जीव महत्वाचा आहे, सरकारने यावेळी प्रो गोविंदा घेऊन साहसी खेळात याचा समावेश आहे. गोविंदाची सुट्टी पण जाहीर केली. १० लाखांचा विमा देखील काढला, असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे राज्याचा दौरा करीत असून निष्ठेची भाषा करीत असल्याबाब त्यांना छेडले असता. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आपली निष्ठा विकली, त्यातही बाळासाहेबांचे विचार विकणाऱ्यांनी निष्ठाचे भाषा आम्हाला शिकवू नये, असा इशाराही त्यांनी दिला. सनातन धर्माला आजही अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे कितीही स्टॅलीन किंवा इतर कोणी आले तरी सनातन धर्माला धक्का लागू शकणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Eknath Shinde News
Pankaja Mundes Regret : अनेकांच्या अडचणी मार्गी लावल्या, पण माझ्या कारखान्याची अडचण सोडवली नाही; पंकजांच्या मनातील खदखद अखेर बाहेर

आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेभी नाका दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अभिनेता जॅकी बगनानी आणि अभिनेत्री रकुल प्रीत कौर यांचीही हजेरी लावली. यावेळी अभिनेत्री रकुल प्रीत कौर यांनी हा माझा पहिला दहीहंडी उत्सव आहे. मला आनंद आहे ठाण्यात येऊन हा उत्सव साजरा करायला मिळाला असल्याचे सांगत सुरक्षेचे नियम पाळण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तर अभिनेता जॅकी बगनानी यांनी मी अनेक हंडी बघितल्या पण हा उत्साह कधीच पहिला नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com