Eknath shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाठले ठाणे, आनंदाश्रमात...

Shiv Sena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली होती.
Eknath Shinde visit Anand Ashram
Eknath Shinde visit Anand Ashram sarkarnama
Published on
Updated on

पंकज रोडेकर

Thane : विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना कुणाची, याबाबत निर्णय दिला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंदाश्रमात जातील, अशी शक्यता होती. मात्र, दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी न चुकता आनंदाश्रमचा रस्ता धरला. दुपारी आनंदाश्रमाला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी त्यांचे गुरुवर्य (स्व.) आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.

विधानसभाध्यक्षांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने राज्यभर जल्लोष केला. पण, मुख्यमंत्री दौऱ्यावर होते. त्यामुळे ते ठाण्यातील किंवा मुंबईतील कोणालाही भेटलेले नाही. रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदे यांचे विमानतळावरही जोरदार स्वागत करण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde visit Anand Ashram
Pune Lok Sabha Seat : पुणे लोकसभेसाठी काँग्रेसचा 'पहिला गिअर' : 20 इच्छुक अन् महत्त्वाची बैठक...

मुख्यमंत्री शिंदे आनंदाश्रमात जाणार असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्यावर शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी आनंदाश्रमाकडे धाव घेतली. मुख्यमंत्री दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आश्रमाजवळ येताच फटाक्यांची आतषबाजी झाली तसेच ढोल-ताशा वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी आश्रमात प्रवक्ते नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, उमेश पाटील आदी उपस्थित होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.

(Edited By Roshan More)

R...

Eknath Shinde visit Anand Ashram
Shiv Sena : मोदींच्या कार्यक्रमात ठाकरे गटाला डावललं? स्थानिक आमदार-खासदारांचा बहिष्कार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com