Shinde vs Thackeray : शिंदे-ठाकरे गटातील वादानंतर मुख्यमंत्री 'अॅक्शन मोड'वर; बोलवली तातडीची बैठक

Meeting With Police : रोशनी शिंदे यांना मारहाणीनंतर उद्धव ठाकरे आक्रमक
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : ठाकरे गटातील महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरोधात सोशल मीडियावर एक पोस्ट केली. ती 'व्हायरल' झाल्यानंतर शिंदे गटातील कार्यकर्ते आक्रमक झाले. शिंदे गटातील काही महिलांनी रोशनी शिंदे यांना मारहाण केली. यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. सत्तांतरानंतर अशा घटनांत वाढ झाली आहे. याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

ठाण्याताली शिवसेनेचे मुख्य कार्यालय असलेल्या आनंदाश्रमात ही बैठक झाली. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्योरोप होत आहेत. त्यामुळे दोन्ही गटात वारंवार वाद वाढल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, ठाकरे समर्थक असलेल्या रोशनी शिंदे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना उद्देशून सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. ती व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटातील काही महिला कार्यकर्त्यांनी रोशनी यांना मारहाण केली. त्यात त्या जखमी झाल्या आहेत. रोशनी या गर्भवती असल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना कासारवडवली येथे सोमवारी (ता. ३) घडली आहे.

Eknath Shinde
BJP NEWS : भाजपला सत्तेवर आणण्यासाठी मदत केल्याचा पश्चाताप होतोय : ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

सध्या राज्यात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा होत आहेत. तसेच शिवसेना-भाजपकडून सावरकर गौरव यात्रेचे आयोजन केले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच छत्रपती संभाजीनगर येथे हिंसाचाराचा प्रकार घडला. आता कासारवडवलीतील प्रकारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे.

Eknath Shinde
BJP NEWS : भाजपला सत्तेवर आणण्यासाठी मदत केल्याचा पश्चाताप होतोय : ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीनंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली. त्याला प्रत्युतर देताना गृहमंत्री यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच राडा घालणाऱ्या कुणालाही सोडणार नसल्याचा इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com