Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Bhiwandi Building Collapsed : भिवंडीतील दुर्घटनास्थळाला मुख्यमंत्र्यांची भेट; मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

Mumbai News : इमारत कोसळल्याने पन्नासहून अधिक लोक अडकल्याची भीती

Eknath Shinde : भिवंडी येथील वलपाडा परिसरातील एक इमारत अचानक कोसळली. या इमारतीच्या राडारोड्याखाली ५० हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना शनिवारी (ता. २९) दुपारी बाराच्या सुमारास घडली. या दुर्घटनास्थाळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा भेट दिली. त्यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

Eknath Shinde
Bazar Samiti Result : बार्शीटाकळी बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व; पण वंचितचीही दमदार 'एन्ट्री'

वल ग्रामपंचायतीच्या (Bhiwandi) हद्दीत वर्धमान नावाची तीन मजली इमारत होती. ही इमारत कोसळल्यानंतर इमारत मालकाला पोलिसांनी ताब्यत घेतले आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावर एक गोडाऊन होते. त्या गोदामात ३० हून अधिक लोक काम करत होते. तर वरील सर्व मजल्यांवर सर्व कुटुंब राहत होती. ही इमारत कोसळ्याने यात ५० ते ६० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Eknath Shinde
Akot Bazar Samit Result : प्रस्थापितांचे वर्चस्व मोडून काढत, सहकार पॅनेलच्या १५ उमेदवारांचा विजय!

सध्या घटनास्थळी प्रशासनाने धाव घेतली आहे. भिवंडी अग्निशामक दालाच्या जवानांनी तेथील राडारोडा हटविण्यास सुरुवात केली होती. 'एनडीआरएफ'नेही (NDRF) घटनास्थळी धाव घेत राडारोड्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे कार्य सुरू केले. आतापर्यंत बारा जणांना बाहेर काढण्यात यश आहे. तर तीन मृतदेह हाती लागले आहेत. दरम्यान, आणखी लोक राडारोड्याखाली दबले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.

Eknath Shinde
Bazar Samiti Result : इस्लामपूर बाजार समितीवर जयंत पाटलांचे वर्चस्व कायम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घटनास्थळावरील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आतापर्यंत बारा लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. इतरांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी आपल्या सर्व यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत देण्यात येईल. तसेच जखमींचा खर्चही शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. यासह परिसरातील जुन्या इमारतींची माहिती घेऊन पावसाळ्यापूर्वी तेथील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना केल्या आहेत."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com