Chitra Wagh- Urfi Javed Dispute : चित्रा वाघ- उर्फी जावेद वाद पेटला; उर्फी उचलणार मोठं पाऊल

उर्फीने महिला आयोगाकडे तक्रार केल्याचीही माहिती आहे.
Urfi Javed and Chitra Wagh
Urfi Javed and Chitra WaghSarkarnama

Chitra Wagh- Urfi Javed Dispute : भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री ऊर्फी जावेदमधला वाद विकोपाला पोहचला आहे. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सातत्याने टार्गेट केल्यानंतर उर्फीनेही आता मोठा निर्णय घेतला आहे. उर्फीच्या वकिलांनी उर्फीला राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali-Chakankar) यांची भेट घेण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर उर्फी आज चाकणकर यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

तसेच, उर्फीने महिला आयोगाकडे तक्रार केल्याचीही माहिती आहे. त्यामुळे आता हे प्रकरण काय वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीवर टीका करत तिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. इतकेच नव्हे तर त्यांनी उर्फीवरून राज्य महिला आयोगावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस बजावली. या नोटिशीवरून पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरु झाले.

Urfi Javed and Chitra Wagh
राष्ट्रवादीकडील मुंबई बाजार समिती ताब्यात घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा डाव भाजपने उधळला; फडणवीसांनी सूत्रे हलवली?

चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या तोकडे कपडे घालण्याच्या मुद्द्यावरुन राज्य महिला आयोगालाच प्रश्न विचारले होते. त्यानंतर महिला आयोगाने वाघ यांना नोटीस बजावली. या नोटिशीला उत्तर देताना “मला अशा 56 नोटीसा रोज येत असतात. त्यात अजून एक आली. त्यात विशेष असं काही नाही आणि त्याचं उत्तरसुद्धा मी दिलेलं आहे. माझा आक्षेप आयोगावर नाही, तर अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर आहे,'' असं चित्रा वाघ यांनी म्हटलं होते.

त्यावर, ''वाघांना पाठवलेली नोटीस त्यांनी नीट वाचली असती, तर हे प्रश्न त्यांना पडले नसते. त्यांचा अभ्यास थोडा कमी असल्याने त्यांनी हे प्रश्न विचारले असावेत. समाजामध्ये खोटी माहिती पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्याविषयी ही नोटीस बजावली असल्याचे सांगित चाकणकर यांनी त्यांना उत्तर दिले.

या सर्व घडामोडींच्या दरम्यान, उर्फी तिच्या ट्विटर अकाऊंटवरून सातत्याने चित्रा वाघांबद्दल काहीना काही पोस्टमधून वाघ यांच्यावर डिवचताना दिसत आहे. ‘चित्रा ताई मेरी खास है, फ्युचर मे होनेवाली सास है’, ‘उर्फी जावेदला दिला त्रास, चित्रा अशी कशी गं तू सास’ असे ट्विट्स उर्फी करताना दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com