Chitra Wagh : उर्फी राहिली बाजूला, चित्रा वाघ यांनाच महिला आयोगाची नोटीस!

Chitra Wagh : वाद आणखीनच चिघळला.
Chitra wagh, Rupali chakankar News
Chitra wagh, Rupali chakankar News Sarkarnama
Published on
Updated on

Chitra Wagh : आपल्या वेगवेगळ्या पेहरावामुळे कायम प्रसिद्धीच्या झोतात असणारी उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद पेटला आहे. उर्फीच्या पेहरावावर वाघ यांनी आक्षेप घेतला होता. काल (दि.५ जाने.) पत्रकार परिषेदेत वाघ महिला आयोगावरही टिप्पणी केली होती. आयोगावर कलेल्या टिपण्णीमुळे वाघ यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे.

महिला आयोगाच्या अध्य़क्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) म्हणाल्या की, "अभिनेत्री तेजस्विनी पंडीत यांना महिला आयोगाने कोणताही पत्र पाठवले नाही. दिग्दर्शक संजय जाधव यांना पत्र पाठवलं होतं.'अनुराधा' या वेबसिरीजचे पोस्टर शहरभर लावले गेले होते. या पोस्टरबाबत पालकांनी तक्रार केल्यानंतर संजय जाधव यांना आयोगाने पत्र पाठवले होते. यामुळे तेजस्विनी पंडीत यांना महिला आयोगाने पत्र पाठवले, अशी चित्रा वाघ यांनी चुकीची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे दिला आहे. "

Chitra wagh, Rupali chakankar News
Pandharpur news : पांडुरंगाला वाहिलेले पोतेभर दागिने निघाले खोटे; कुणी कुणाला फसवलं; सराफांनी भक्तांना की....

"आयोग तीस वर्षापासून काम करतंय, आयोगाची गरिमा मोठी आहे. कर्तुत्ववान स्त्रियांनी आयोगासाठी योगदान दिलेले आहे. मात्र स्वत:च्या प्रसिद्धीसाठी आयोगावर खोटे आरोप करण्यात येत, त्यामुळे आता चित्रा वाघ यांना अयोगाच्या वतीने नोटीस पाठवण्यात येत आहे. ही नोटीस आता वाघ यांना गेलेली आहे." असे चाकणकर म्हणाल्या. 'आपण राज्य महिला आयोगाची अप्रतिष्ठा होईल, असे वक्तव्य केले आहे,' असा ठपका आता चित्रा वाघ यांच्यावर ठेवण्यात आलेले आहे.

Chitra wagh, Rupali chakankar News
Satara : ठाकरे सेना तुम्हीच राष्ट्रवादीच्या मांडीवर नेऊन बसवली... शंभूराज देसाई

उर्फीनिमित्त सुरू झालेला वाद आता चाकणकर आणि वाघ यांच्यातच पेटल्याने, ही लढाई आता थेट भाजप व राष्ट्रवादीमधील झाले आहे. यावर अद्याप वाघ यांनी भूमिका स्पष्ट केलेले नाही, मात्र आता वाघ महिला आयोगाच्या नोटीशीला कसे उत्तर देतात, व प्रकरण पुढे काय काय वळण घेईल, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com