संजय शिरसाट त्यावेळी आघाडीवर होते, कधी करणार, कधी करणार म्हणायचे!

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिरसाट यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर टीका केली होती.
CM Eknath Shinde Latest News, Mla Sanjay Sirsat News
CM Eknath Shinde Latest News, Mla Sanjay Sirsat NewsSarkarnama

मुंबई : राज्यातील सत्तानाट्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आपलं मन मोकळं केलं. गुरूवारी मुंबईत मध्यरात्री झालेल्या मेळाव्यात त्यांनी त्यावेळी घडलेल्या घडामोडींवर भाष्य करत नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. सर्व 50 आमदार आपल्यासोबत स्वेच्छेने आले होते. त्यांचं अस्तित्वच धोक्यात आलं होतं, असं मुख्यमंत्री म्हणाले. (CM Eknath Shinde Latest News)

आमदारांना तिथं डांबून ठेवल्याचा दावा खासदार संजय राऊतांसह शिवसेनेतील (Shiv Sena) काही नेत्यांकडून केला जात होता. पण हा दावा शिंदे यांनी पुन्हा एकदा फेटाळून लावला. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सहा महिन्यांतच सगळं समोर दिसायला लागलं. आमदारांचं अस्तिस्त धोक्यात आल्यानं ते माझ्यासोबत आले. त्यावेळी संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आघाडीवर होते. कधी करणार, कधी करणार असं म्हणत होते. मी म्हटलं, अरे थांबा जरा. त्याला वेळ यावी लागते, समोरच्याला संधी द्यावी लागते, असं शिंदे यांनी सांगितलं.

CM Eknath Shinde Latest News, Mla Sanjay Sirsat News
पंतप्रधान मोदींनीही एकनाथ शिंदेंचं 'ते' भाषण संपूर्ण ऐकलं अन् म्हणाले...

आम्ही खूप प्रयत्न केले. ज्या शिवसेना-भाजप युतीमध्ये निवडणुका लढलो आणि गेल्या दहा-पंधरा दिवसांत आम्ही केलं ते अडीच वर्षांपूर्वीच व्हायला हवं होतं. पण दुर्देवाने झाले नाही. त्यावेळी आमचं हे चुकीचं सुरू आहे हेच म्हणणं होतं. हे बदलायला हवे, असं अनेक जण म्हणत होते, असं शिंदे म्हणाले.

सहा महिन्यांत कळालं की जे आपल्यासोबत आहेत ते बगलेमध्ये धरून मुंडी दाबायला लागले. ते आपल्याला संपवायला लागले. पराभूतांना ताकद द्यायला सुरू झाले. यापुढचा आमदार, मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच, असं म्हणते होते. मी चार-पाच वेळा प्रयत्न केले. यांना सोडा असं सांगत होतो. हे आपल्यासाठी घातक आहे. मतदारांना आम्ही काय तोंड देणार, हे सांगत होतो, अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली.

CM Eknath Shinde Latest News, Mla Sanjay Sirsat News
'मविआ'ला झटका; सरपंच-नगराध्यक्षांच्या निवडीबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय

मतदारसंघातील मतदारांशी तुमची बांधिलकी आहे. त्यांना न्याय द्यायचा असेल तर निधी पाहिजे. ही अस्तित्वाची लढाई होती. सरकारमध्ये आपला मुख्यमंत्री असताना अपेक्षा असते की आपली कामे व्हायला हवीत. पण तसं झालं नाही. कामं झालं दुसऱ्यांचीच. नगरपालिका निवडणुकीत चार नंबरला गेली. ज्या सरकारमध्ये शिवसेना आहे, त्या शिवसैनिकांना काय मिळालं. त्यांच्या जीवनात काय बदल घडला. पण खोट्या केसेसला सामोरे जावे लागले. तडीपार झाले. तालुक्याप्रमुख, जिल्हाप्रमुख रडत होते. आपल्याकडे अधिकार असतानाही काही करू शकलो नाही. कशाला पाहिजे ती सत्ता, अशी टीका शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com