Eknath Shinde News : सी वोटरच्या सर्व्हेची मुख्यमंत्र्यांनी उडविली खिल्ली, म्हणाले "राजकारणात..."

Election Predition Survey : सर्वेक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळले
Eknath Shinde, Sanjay Raut
Eknath Shinde, Sanjay RautSarkarnama

Eknath Shinde on Survey : इंडिया टुडे-सी वोटरच्या सर्व्हेवरून देशात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विरोधात जनमत आहे, असे दिसून येते. या सर्व्हेतील महाराष्ट्राबाबतची (Maharashtra) आकडेवारीही सत्ताधारी पक्षाच्या हातून सत्ता जाईल, अशीच आहे. त्या सर्वेची खिल्ली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी खिल्ली उडविली आहे.

या सर्वेत महाविकास आघाडीला सर्वात जास्त जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा सर्वे फेटाळला आहे. त्यावेळी त्यांनी राजकारणातील गणित आणि शाळेत शिकलेले व व्यावहारातील गणित यातील फरकही सांगितला.

Eknath Shinde, Sanjay Raut
Nitin Gadkari : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात नितीन गडकरी...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, "राजकारणातील निवडणुकांच्या गणितात दोन प्लस दोन म्हणजे चार, असे कधीच होत नाही. सर्वेच्या अंदाजात महाविकास आघाडीबाबत वर्तविलेले आकेड किती वजा होतील हे येणारा काळ ठरवेल. तसेच सध्या राज्यात आमच्या सरकारच्या काळात होणारे काम पाहून महाविकास आघाडीला त्यांच्या आहे त्या जागा राखता येतील का नाही, याबाबतही शंका आहे. महाविकास आघाडीच्या चार-पाच जागा निवडून आल्या तरी पुरे", असे म्हणत त्यांनी आघाडीची खिल्ली उडवत सर्वेतील अंदाज खोटे असल्याचे म्हटले आहे.

Eknath Shinde, Sanjay Raut
Marathwada Teacher Constituency : प्रचार थांबला, सोमवारी मतदान ; काळे-पाटील यांच्यात थेट लढत..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे.

राऊत म्हणाले, "जेव्हा त्यांच्या सोयीचे सर्वे असतात, तेव्हा त्यांना ते हवे असतात. राष्ट्रीय स्तवरील सर्वे त्यांच्या बाजूचा आहे तो त्यांना हवाय; पण महाराष्ट्रातील सर्वे त्यांच्या विरोधातील आहे, तो त्यांना नकोय. सर्वेनुसार राज्यात महाविकास आघाडीला साधारणतः ३४ जागा मिळतील, असा अनुमान आहे. पण आम्ही म्हणतो या जागा साधारणः ४० ते ४५ असतील. मुख्यमंत्र्यांनी कल्याण-डोंबिवलीची (Kalyan Dombivali) जागा वाचविली तरी पुरे", असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

Eknath Shinde, Sanjay Raut
Chinchwad By-Election : काँग्रेस चिंचवड लढवण्यावर ठाम : अर्ज भरण्यास सुरुवात

दरम्यान राष्ट्रवादीचे शरद पावर (Sharad Pawar) यांनीही इंडिया टुडे-सी वोटरच्या सर्व्हेची पाच, दहा वर्षात बऱ्याचदा अचूकता सिद्ध झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी एक दिशा त्यांनी दाखवलेली असून ती दिशा सत्ताधारी पक्षाला सोयीची नसल्याचे पवार ) यांनी कोल्हापुरात सांगितले.

सध्या लोकसभा निवडणूक झाली तर राज्यात महाविकास आघाडीच्या जागा वाढतील आणि भाजप प्रणित एनडीएच्या जागा कमी होतील, असा अंदाज सी-वोटरच्या सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व्हेमुळे राज्यातील संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com