MNS Deepotsav : नव्या युतीची नांदी : राज ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणाले, "आपले काही काम असेल तर सांगा, मी करतो...

MNS Deepotsav : दीपोत्सव कार्यक्रम हे निमित्त असले तरी आगामी काळात महाराष्ट्रात नव्या राजकीय युतीची तर ही नांदी नाही ना?
MNS Deepotsav news
MNS Deepotsav newssarkarnama

MNS Deepotsav : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (Maharashtra Navnirman Sena) दीपोत्सव शुक्रवारी सांयकाळी शिवाजी पार्क येथे झाला. यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बाळा नांदगावकर, अमित ठाकरे आदींनी उपस्थिती लावली. मुख्यमंत्र्यांनी कळ दाबून दीपोत्सव कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन केले (Raj Thackeray latest news)

फडणवीस-शिंदे-ठाकरे एकाच व्यासपीठावर आल्याने राज्यात नव्या राजकीय समीकरणाची ही नांदी तर नाही ना, असा प्रश्ना अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. या तीन दिग्गज नेत्यांचे एकत्र येणे हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे दीपोत्सव कार्यक्रम हे निमित्त असले तरी आगामी काळात महाराष्ट्रात नव्या राजकीय युतीची तर ही नांदी नाही ना? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.

मनसे, भाजप आणि शिंदे गट यांच्यातील जवळीक वाढता आगामी मुंबई महापालिका आणि राज्यातील इतरही निवडणुकांमध्ये नवे राजकीय समीकरण दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानात काहीतरी सांगितले, त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्र्यांची चौफेर फटकेबाजी

मुख्यमंत्र्यांनी इच्छा असायची पण..

राज ठाकरे म्हणाले, "आम्ही दिपोत्सव कार्यक्रम 10 वर्षांपासून घेत आहोत. अनेकांनी मला विचारले की, नातू झाल्यामुळे दिपोत्सव कार्यक्रम घेत आहात का मी म्हटले नातू नाही, दिवे...! पण नातू होण्याचा आणि दीपोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा काही संबंध नाही. आपण दरवर्षी हा कार्यक्रम वाढवत जाऊ. मुख्यमंत्र्यांनी इच्छा असायची पण दिपोत्सवाला आधी येता येत नव्हते,"

राज ठाकरे कधीही येऊ शकतात...

यावेळी राज ठाकरेंना उद्देशून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आपले काही काम असेल तर सांगा, मी करतो. तुम्हाला अनेक लोक भेटतात. तु्मचे काम ते लोकांचेच काम असते. आम्ही उशिरा पर्यंत काम करतो त्यामुळे राज ठाकरे कधीही येऊ शकतात. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, त्यांच्या कल्याणासाठी नुकसान भरपाईचे एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून मदत दिली. शेतकरी अन्नदाता असून त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.

इच्छा असूनही इकडे येता आले नाही..

"सर्वांना सोबत घेऊन दिवाळीची सुरूवात राज ठाकरे आणि त्यांचे सहकारी करतात. दिपोत्सवाचा आगळा-वेगळा कार्यक्रम आहे. यंदा आमच्या सरकारने सर्वच उत्सव जोरदार करण्याचे वचन पाळले. लोकांनी गणेशोत्सव आणि नवरात्रीत आनंद घेतला," असे मुख्यमंत्री म्हणाले. "कोरोनामुळे सर्वजण दबून बसले होते, पण आता सर्वजण मोकळे झाले आहेत. दहा वर्षांपासून तुम्ही कार्यक्रम घेत आहात. पण मनात इच्छा असूनही इकडे येता आले नाही.

"दिपावलीच्या खूप शुभेच्छा देतो. सर्वांच्या जीवनात सुखाचे क्षण यावे. दिवाळी महत्वाचा सण आहे. या दिव्यांच्या माध्यमातून एकप्रकारे आपल्यातील तेज जागृत करीत असतो. दिपोत्सव आपल्यासाठी महत्वाचा उत्सव आहे. लक्ष -लक्ष दिवे प्रज्वलित झाले आहे, लख्ख प्रकाश आपल्या जीवनातही येवो यासाठी मी शुभेच्छा देतो," असे फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com