ShivSena SC Hearing : सत्तेसाठी आत्मा विकण्याचे धाडस यापुढे कोणी करणार नाही ; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

SC Hearing On Maharashtra Poltical Crisis : बाळासाहेबांच्या विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला ही चपराक
SC Hearing On Maharashtra Poltical Crisis
SC Hearing On Maharashtra Poltical CrisisSarkarnama

SC Hearing On Maharashtra Poltical Crisis : सर्वोच्च न्यायालयानं आज सत्तासंघर्षावर निर्णय दिला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.

सर्वोच्च न्यायालयाने आमचं सरकार घटनात्मक ठरवल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कोर्टाने दिलेल्या निर्णयावर आम्ही समाधानी आहोत. महाविकास आघाडीच्या मनसुब्यावर सर्वोच्च न्यायालयाने पाणी फेरल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. तसंच आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार हा अध्यक्षांना असतो, असंही न्यायालयाने स्पष्ट केल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. न्यायालयाच्या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टि्वट करीत ठाकरे गटाला फटकारलं.

SC Hearing On Maharashtra Poltical Crisis
Supreme Court : न्यायालयाच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया , सत्याचा विजय झाला..; आमच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झालं..

नितीमत्तेची भाषा करू नये..

"अखेर सत्याचा विजय..,जनमताचा मान ठेवणारा निकाल…घराणेशाही विरोधात सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विजय…" असा शब्दात मुख्यमंत्र्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केलं आहे. "सत्तेसाठी, मुख्यमंत्रीपदासाठी नितीमत्ता सोडणाऱ्यांनी नितीमत्तेची भाषा करू नये," अशा शब्दात शिंदेंनी ठाकरे गटाला सुनावलं आहे.

संघर्षाचा हा विजय..

"हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेबांच्या विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला ही चपराक आहे. मतदार राजाचा सन्मान करणारा निर्णय,शिवसेना वाचविण्यासाठी केलेल्या संघर्षाचा हा विजय आहे. यापुढे जनमताची फसवणूक करणारे पक्ष सत्तेसाठी आपला आत्मा विकण्याचे धाडस करणार नाही," असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

SC Hearing On Maharashtra Poltical Crisis
Supreme Court Hearing on ShivSena : सुप्रीम कोर्टाच्या निकालपत्रात काय म्हटलयं ? कोश्यारींनी बहुमत चाचणी..

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले,"लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे. देशात संविधान आहे, फायदा, नियम आहे, त्याबाहेर कुणालाही जाता येत नाही, कायदेशीर बाबीची पुर्तता करुनच आम्ही सरकार स्थापन केले आहे. बेकायदेशी सरकार, घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांनाच न्यायालयानं कालबाह्य केले, त्यांना न्यायालयानं चपराक दिली आहे. अपात्रेचा अधिकार अध्यक्षांना असतो, असा आम्ही दावा केला होता, तोच निर्णय न्यायालयानं घेतला आहे,"

SC Hearing On Maharashtra Poltical Crisis
Supreme Court Live : शिवसेना कुणाची ? ; न्यायालयानं ठाकरे, शिंदे गटाला फटकारलं..अध्यक्षचं घेणार निर्णय..

" ठाकरे सरकार अल्पमतात आले, हे राज्यापालांसह सगळ्यानेच माहित होते, त्यामुळे त्यांना राजीनामा देण्याखेरीज कुठलाच पर्याय नव्हता," असे शिंदे म्हणाले. "आम्ही जनमताचा, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा आम्हा आदर केला आहे," असे एकनाथ शिंदे म्हणाले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com