Eknath Shinde : आदित्य ठाकरेंच्या 'करप्ट मॅन'ला मुख्यमंत्री शिंदेंचं 'कॉमन मॅन'नं उत्तर

Aaditya Thackeray : मुख्यमंत्री असलो तरी आजही मी कार्यकर्ताच आहे. माझ्या डोक्यात पदाची हवा गेलेली नाही
Eknath Shinde, Aaditya Thackeray
Eknath Shinde, Aaditya ThackeraySrkarnama
Published on
Updated on

Jalgaon Political News : मुख्यमंत्री पदासाठी हापापलेल्या ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले. सत्तेसाठी त्यांनी आपले विचार गुंडाळून ठेवले. आता राज्यात जनतेच्या मनातील सरकार आहे. सर्व सामान्य लोकांसाठी आम्ही गावोगावी जात आहोत. ते मात्र घरात बसून होते. मुख्यमंत्री असलो तरी आजही मी कार्यकर्ताच आहे. माझ्या डोक्यात पदाची हवा गेलेली नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरेंना सडतोड उत्तर दिले.

जळगावमधील तापी नदीवरील मुक्ताईनगर-रावेर हा पुलाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधीवेशनाच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) भ्रष्टाचारी म्हणून टीका केली होती. आजच्या काळात सीएम म्हणजे 'करप्ट मॅन' असा उल्लेख आदित्य ठाकेरेंनी केला होता. त्याला उत्तर देताना शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री झालो असलो तरी मी सर्वसामान्य लोकांसाठी काम करत आहे. कार्यकर्ता म्हणूनच लोकांच्या दारात जात आहे.त्यामुळे माझ्या लेखी सीएम म्हणजे 'कॉमन मॅन' आहे. हे तोंडात चांदीचा चमचा घेऊन आलेल्यांना समजाणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde, Aaditya Thackeray
Eknath Shinde : मुख्यमंत्री होईपर्यंत वापरून घेतलं अन् नंतर...; ठाकरेंनी काय केलं ते शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

यावेळी शिंदेंनी 50 खोक्याच्या आरोपांवरही उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, खोक्यांचा आरोप कुणावर करता. गुलाबराव पाटील, चंद्रकांत पाटील, चिमणआबा, हा एकनाथ शिंदे काय या सर्वांनी शिवसेना मोठी केली. रक्ताचे पाणी केले. घरादारावर तुलसीपत्र ठेवले. बाळासाहेबांच्या सोबतीने शिवसेनेसाठी काम केले. जेल भोगले, केसेस आंगावर घेतल्या. त्यावेळी तुम्ही कुठे होता. त्यांच्यावर एकतरी केस दाखवा आणि 50 खोक्यांचे बक्षीस घ्या. तुम्हाला खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतात, असा निशाणा शिंदेंनी ठाकरेंवर (Uddhav Thackeray) साधला.

आज बाळासाहेबांची शिवसेना, धनुष्यबाण आपल्याकडे आहे. बाळासाहेबांचे विचार आपल्याकडे आहेत. त्यांनी मात्र या शिवसेनकडे 50 कोटी मागणी करणारे पत्र दिले. ते पैसे शिवसेनिकांचे आहेत. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता सांगितले की त्यांना पैसेच पाहिजे तर देऊन टाका. त्यांना बाळासाहेबांचे विचार नकोत. ते फक्त पैशांचे धनी आहेत. बाळासाहेबांची संपत्तीच आमचे ऐश्वर्य आहे. ते टिकवण्यासाठीच उठाव केला, असेही शिंदेंनी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

Eknath Shinde, Aaditya Thackeray
Sanjay Gaikwad News : सतत कायदा हातात घेणाऱ्या संजय गायकवाडांना शिंदे-फडणवीस-पवारांचाही धाक उरला नाही का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com