मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय कक्षाची विरोधकांनाही भुरळ !

आजारी रूग्णांना शक्य तेवढी मदत करावी, असा मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांचा नेहमी आग्रह असतो. मुख्यमंत्र्यांच्या याधोरणामुळेच वैद्यकीय सहायता कक्षाची लोकप्रियतावाढली आहे .-ओमप्रकाश शेटे
CM Medical assistance scheme
CM Medical assistance scheme

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय सहायता निधी कक्षाकडून मदत मिळविण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून सामान्य लोक येत असतात. या योजनेचा लाभ आपल्या मतदारसंघातील जनतेला मिळवून देण्यासाठी सत्ताधारी पक्षांबरोबरच विरोधी पक्षातील नेते, आमदारही उपयोग करून घेत आहेत. त्यामुळे विरोधकांमध्येही ही योजना लोकप्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे.

मतदारसंघातील रूग्णांना अथवा अन्य आजारी गरजूंना मदत मिळविण्यासाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार संग्राम थोपटे, दिलीप सोपल, जयंत पाटील, दिपिका संजय चव्हाण, खासदार राजू शेट्टी, अमित झनक, शरद बोंद्रे,माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासारख्या अनेक लोकप्रतिनिधींचे सतत अर्ज
येतात. 

आमदार बच्चू कडू, राहूल कुल, राजाभाऊ वाझे, हेमंत पाटील, उल्हास पाटील, सुरेश खाडे, अमीन पटेल, अनिल कदम, अतुल सावे बब्रुवान खंदारे, प्रा. शरद पाटील, विजयराज शिंदे, मनोहर पटवारी असे आजी माजी आमदारही विविध रूग्णांना मदत मिळवून देण्यासाठी येत असतात. 

आमदार व विरोधकांबरोबरच विद्यमान मंत्र्यांकडूनही मदतनिधीसाठी सतत पाठपुरावा होत असतो. यात पंकजाताई मुंडे, बबनराव लोणीकर, सुधीर मुनगुंटीवार, राम शिंदे,
चंद्रकांत पाटील, मदन येरावार, विजय देशमुख, सुभाष देशमुख, दादा भुसे,सुभाष देसाई यांचे प्रमाण जास्त आहे.
एका आठवड्यात १०० पेक्षा जास्त आमदार वैद्यकीय सहाय्यता कक्षामध्ये अर्ज करण्यासाठी किंवा अगोदर केलेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी येत असतात. 

विधीमंडळ अधिवेशनाच्या काळामध्ये तर सामान्य लोकांच्या
गर्दीपेक्षा आमदारांचीच गर्दी या कक्षामध्ये पाहायला मिळते.
गंभीर आजार उदभवल्याने रूग्णांना मोठ्या निधीची गरज भासते. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून अशा गरजूंना दोन लाखापर्यंत मदत केली जाते. त्यापेक्षा मोठा खर्च असेल तर अन्य संस्थांच्या माध्यमातून हा कक्ष मदत मिळवून देत असतो.

ब-याचदा ग्रामीण भागातील लोकांना मंत्रालयात येण्याचा त्रास होऊ नये म्हणून अनेक आमदार अशा रूग्णांना मदत मिळवून देण्यासाठी स्वतःच वैद्यकीय सहायता निधी कक्षाकडे पाठपुरावा करीत असतात, असे याकक्षाचे विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाश शेटे यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले. 

आजारी रूग्णांना शक्य तेवढी मदत करावी, असा मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांचा नेहमी आग्रह असतो. मुख्यमंत्र्यांच्या या
धोरणामुळेच वैद्यकीय सहायता कक्षाची लोकप्रियता वाढल्याचे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com