किरीट सोमय्या अधिकाऱ्याच्या खुर्चीत हसत बसले; मुख्यमंत्र्यांनी दिला हा आदेश

सोमय्या यांनी कोणत्या अधिकारात फाईल पाहिल्या, याचा शोध घेतला जात आहे.
Kirit Somaiya
Kirit SomaiyaSarkarnama

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना नगरविकास विभागातील फाईल चाळतानाचा फोटो व्हायरला झाला. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या बांधकामांचा दंड माफ करणारी कागदपत्रे त्यांनी चाळली आणि कागदपत्रांचे स्क्रिन शाॅटही व्हायरला केला. सरनाईक यांचा दंड माफ करण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीसाठी जी टिप्पणी बनवली होती. ती देखील सोमय्या यांनी मिळवली.

Kirit Somaiya
केंद्र आणि राज्याच्या वादात प्रताप सरनाईक बळीचा बकरा!

सोमय्या हे थेट त्या कार्यालयात कसे गेले, त्यांना संबंधित फाईल कोणत्या अधिकारात दाखवली, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्याची चौकशी करण्याचा आदेश त्यांनी मुख्य सचिवांना दिला आहे. त्यामुळे सोमैय्या यांच्यावर महाविकास आघाडी सरकार काय कारवाई करणार, याची उत्सुकता आहे. सरनाईक यांच्या विरोधात आक्रमक झालेल्या सोमय्या यांना खिंडीत गाठण्याची संधी महाविकास आघाडी सरकार या निमित्ताने गाठणार का, याचीही चर्चा सुरू झाली आहे.

Kirit Somaiya
Video : प्रताप सरनाईक यांच्याविरोधात किरीट सोमय्या पुन्हा आक्रमक

सरनाईक यांचा सुमारे 18 कोटी रुपयांचा दंड माफ करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाला होता. त्याचे इतिवृत्त अद्याप निश्चित झालेले नाही, असा तांत्रिक मुद्दा काॅंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ बैठकीसाठी बनविलेली टिपणी ही गोपनीय स्वरूपात मोडते. त्याचा भंग सोमय्या यांनी केल्याचा ठपका सावंत यांनी ठेवला आहे.

सोमय्या यांनी सरनाईक यांना दंड भरावाच लागेल, असे आव्हान देत त्यांना सवलत देण्याच्या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. यासाठीची पत्रकार परिषद झाल्यानंतर ते थेट मंत्रालयातील नगरविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन त्यांनी कागदपत्रे चाळली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com