कॅबिनेटमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना धक्का; ठाकरेंनी विषयच काढला नाही

एकनाथ शिंदे यांच्या बंडांमुळे राज्याच्या राजकारण वादळ उठलं आहे.
Uddhav Thackeray Latest Marathi News, Ajit Pawar Latest Marathi News, Balasaheb Thorat News
Uddhav Thackeray Latest Marathi News, Ajit Pawar Latest Marathi News, Balasaheb Thorat NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेत आतापर्यंत सर्वात मोठे बंड झाल्याने महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यापार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाचे मोठे पडसाद उमटतील, अशी शक्यता होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार, याकडे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचंही लक्ष होतं. पण प्रत्यक्षात बैठकीला सुरूवात झाल्यानंतर सर्वच मंत्र्यांना धक्का बसला. (CM Uddhav Thackeray Latest Marathi News)

मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे राजीनामा देणार, सरकार बरखास्त होणार अशा अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे आजची बैठक शेवटी असेल, असा विचार करून मंत्री बैठकीला पोहचले होते. पण बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राजकीय विषय काढलाच नाही.

Uddhav Thackeray Latest Marathi News, Ajit Pawar Latest Marathi News, Balasaheb Thorat News
एकनाथ शिंदेंचा पहिला मास्टरस्ट्रोक; सुनील प्रभूंची मुख्य प्रतोदपदावरून उचलबांगडी

मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली. कोरोनाची सर्व स्थिती आणि त्यावर उपाययोजना काय कराव्यात, याबाबत जवळपास दहा मिनिटे चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. राज्यात मास्कसक्ती करायची की नाही, असं ठाकरेंनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना विचारलं. तुम्ही माहिती घ्या, मी टास्क फोर्सशी चर्चा करतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.

बैठकीत नियमित अकरा प्रस्तांवरच चर्चा झाली. सरकार बरखास्ती किंवा कोणत्याही राजकीय मुद्यांवर चर्चा झाली नाही, असं बैठक संपल्यानंतर काही मंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री आज निश्चित दिसत होते, असंही काहींनी सांगितलं. पुढेही अशीच साथ द्या, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केल्याचे समजते.

दरम्यान, या बैठकीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब व्हीसीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. तर दादाजी भूसे, सुभाष देसाई हे बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते. आदित्य यांनी आपल्या ट्विटरवरून पर्यावरण मंत्री हा उल्लेख काढून टाकला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com