नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत. यातच आता महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी दणका दिला आहे. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder) दरात आजपासून 105 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपताच घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरातही मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीच्या दरात आजपासून 105 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे या सिलिंडरचा दर आता 2 हजार 12 रुपयांवर पोचला आहे. मागील वर्षी सलग 4 महिन्यांत या सिलिंडरच्या दरात 484 रुपयांची वाढ झाली होती. नंतर चालू वर्षात 1 जानेवारीपासून हा दर 102.50 रुपयांनी कमी झाला होता. यानंतर 1 फेब्रुवारीला या एलपीजीच्या दरात 91.50 रुपयांची कपात केली. आता पुन्हा या सिलिंडरचा दर वाढवण्यात आला आहे. यामुळे हॉटेल, रेस्टॉरन्ट, खाद्यपदार्थ विक्रेते आणि चहावाले यांना मोठा फटका बसणार आहे.
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची दरवाढ
1 सप्टेंबर (2020) - 75 रुपये
1 ऑक्टोबर - 43 रुपये
1 नोव्हेंबर -266 रुपये
1 डिसेंबर - 100 रुपये
1 मार्च (2022) -105 रुपये
--------------------------------
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची दरकपात
6 ऑक्टोबर - 2 रुपये 50 पैसे
1 जानेवारी (2021) - 102.50 रुपये
1 फेब्रुवारी - 91.50
गेल्या वर्षी 6 ऑक्टोबरपासून घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झालेली नाही. देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पार पडताच 7 मार्चनंतर एलपीजी सिलिंडरचे दर 100 ते 200 रुपयांनी वाढू शकतात. सध्या सिलिंडरचा दर सुमारे 900 रुपये आहे. तो हजार रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. यामुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला एलपीजी सिलिंडर दरवाढीचे चटके बसणार आहेत. देशातील 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवले असले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावाचा भडका उडाला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग कमी झाला असून, याचवेळी महागाई वाढू लागली आहे. याचा परिणाम अनेक बड्या केंद्रीय बँकांच्या पतधोरणावर आहे. याचवेळी रशियांने युक्रेनवर हल्ला केल्याने खनिज तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे खनिज तेलाचा भाव प्रतिबॅरल 100 डॉलरवर गेला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.