LPG Cylinder : गुड न्यूज : कमर्शिअल गॅस सिलेंडर्सच्या किंमतींमध्ये मोठी घट, घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे

Commercial LPG Cylinder Prices Slashed : तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीमध्ये 100 रूपयांनी घट केली आहे. घरगुती सिलिंडरच्या किंमतीमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
LPG Cylinder News
LPG Cylinder NewsSarkarnama
Published on
Updated on

पुणे : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांसाठी गुड न्यूज आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी आज एलपीजी च्या कमर्शिअल सिलेंडर्स किंमतींमध्ये (Commercial LPG Cylinder Prices) घट झाली आहे.

तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीमध्ये 100 रूपयांनी घट केली आहे. घरगुती सिलिंडरच्या किंमतीमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे तुर्तास सामान्यांना थेट दिलासा मिळाला नसला तरी तेल कंपन्यांच्या निर्णयामुळे देशभरात व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीमध्ये मोठी घट झाली आहे. नवीन दर 1 सप्टेंबर 2022 पासून म्हणजे आजपासूनच लागू झाले आहेत.

तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला तरी पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये स्थिरता कायम आहे. आज एलपीजी सिलेंडर्सच्या किंमती मध्ये 91.50 रूपयांनी घट नोंदवण्यात आली आहे. इंडियन ऑईलच्या माहितीनुसार, आता दिल्ली (Delhi) मध्ये 19 किलोच्या कमर्शिअल सिलेंडर साठी 1885 रूपये तर मुंबई (Mumbai) मध्ये 1844 रूपये मोजावे लागणार आहेत. (Commercial LPG Cylinder Prices Slashed)

LPG Cylinder News
Shiv Sena : गणेशोत्सवात भक्तिभावापेक्षा राजकीय भावच जास्त ; शिवसेनेचा सरकारवर हल्लाबोल

काही दिवसांपूर्वी सरकार कडून सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा देण्यासाठी उज्ज्वला योजना अंतर्गत 200 रूपये प्रति सिलेंडरची घोषणा झाली आहे. ही सबसिडी 12 सिलेंडर्स साठी मिळणार आहे. सरकारच्या या घोषणेमुळे 9 कोटी पेक्षा जास्त लोकांना फायदा मिळणार आहे.

असे आहेत नवीन दर

  1. दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर 91.50 रुपयांनी कमी झाले. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर सध्या 1,885 रुपयांना मिळत आहे.

  2. मुंबईत व्यावसायिक सिलिंडरचे दर 92.50 रुपयांनी कमी झाल्यानंतर सिलिंडर 1844 रुपयांना विकला जात आहे.

  3. कोलकात्यात 100 रुपयांच्या दर कपातीनंतर सिलिंडर 1995 रुपयांना विकला जात आहे.

  4. चेन्नईमध्ये एकूण 96 रुपयांची कपात करण्यात आली आहे. येथे व्यावसायिक सिलिंडर 2,045 रुपयांना मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com