विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांसाठी आयुक्त संजय पांडेंचा नवा प्लॅन

IPS Sanjay Pandey | मुंबईत बेशिस्त वाहन चालकांना वटणीवर आणण्याचे मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी ठरवले आहे.
IPS Sanjay Pandey News Updates | Mumbai Traffic Rule News
IPS Sanjay Pandey News Updates | Mumbai Traffic Rule News

मुंबई : बेशिस्त वाहन चालकांनो आता जर नियम मोडाल तर थेट तुरुंगात जाल, असा इशाराच मुंबईचे नवनिर्वाचित पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी बेशिस्त वाहनचालकांना इशारा दिला आहे. मुंबई पोलिस सोमवार (७ मार्च) पासून विरुद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करणार आहेत. इतकेच नव्हे तर त्या चालकांची गाडीही जप्त केली जाणार, असल्याचे आदेश मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी त्यांच्या फेसबुक लाइव्हमध्ये दिले आहेत. (IPS Sanjay Pandey News)

आयुक्त संजय पांडे दर रविवारी मुंबईकरांशी फेसबुकद्वारे संवाद साधणार आहेत. यात आठवड्यांच्या कामांची माहिती देणार आहेत. मुंबईतील बेशिस्त वाहन चालकांना वटणीवर आणण्यासाठी मुंबई पोलिसांनी नवा प्लॅन आखला आहे. यासाठी आयुक्त पांडे यांनी सर्व पोलिस ठाण्याच्या वरिष्ठांना व विशेषता वाहतूक पोलिसांना विरूद्ध दिशेने गाडी चालवणारे व विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.

IPS Sanjay Pandey News Updates | Mumbai Traffic Rule News
मोठी बातमी : महापालिका, ZP निवडणुका सहा महिने लांबणीवर; आताची प्रभागरचना रद्द

हेल्मट न घालता वाहन चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर विरूद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्यांवरही थेट गुन्हा नोंदवून त्यांची गाडी जप्त करण्याचे आदेश पांडे यांनी वाहतुक पोलिसांना दिले आहेत. विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या चालकाला अनेक ठिकाणी फिरावे लागेल, कायदेशीररित्या न्यायालयासमोर जावे लागेल, मी माझे अधिकारी व अंमलदारांना याप्रकरणी वाहतुक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोमवारपासून ही कारवाई सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त संजय पांडे यांनी स्वत: दिले आहेत.

या पूर्वी सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर आम्ही गाड्या उचलणे बंद करण्याच्या विचारात आहोत. फक्त वाहतूकीला अडथळा ठरेल अशा कोणत्याही ठिकाणी नागरिकांनी गाड्या लावू नयेत. कारण अनेकदा महत्वाच्या कामाला बाहेर पडलेल्या व्यक्ती मिळेल त्या ठिकाणी गाडी पार्क जातात. त्यामुळे अनेकदा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, पण नागरिकांनी सहकार्य करत वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी गाडी पार्क करावी, अशी विनंती आयुक्त संजय पांडे यांनी केली होती.

IPS Sanjay Pandey News Updates | Mumbai Traffic Rule News
रशियानं झेलेन्स्की यांची हत्या केल्यास युक्रेनचा पुढचा प्लॅन तयार

याशिवाय ध्वनी प्रदुषणाबाबतही पोलीस कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी करण्याचे त्यांनी संकेत दिले. विशेषत: बांधकामाच्या ठिकाणी वेळेचे बंधन न पाळता अहोरात्र काम सुरु असते. याबाबतही मी अंमलदार व अधिकाऱ्यांना कळवले असून त्याबाबतही काय पावले उचलणार हे आपल्याला लवकरच कळेल, याशिवाय परदेशात राहणाऱ्या व्यक्तींच्या मालमत्ता बळकावण्याचे प्रकार कानावर आले आहेत. याबाबत पांडे यांनी मालमत्ता बळकवणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले.

मोबाइल अथवा दागिने चोरीची तक्रार घेऊन नागरिक आल्यास अनेक अंमलदार वस्तू गहाळ झाल्याची नोंद करतात. ही चुकीची कार्यपद्धती आहे. मोबाइल अथवा दागिने चोरीच्या प्रकरणात गुन्हा दाखल करावा, असे आवाहन पांडे यांनी केले. तसे न केल्यास संबंधीत पोलिसांवर कारवाई करण्याचे संकेतही यावेळी पांडे यांनी दिले. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला मुंबई पोलीस प्राधान्य देणार आहेत. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांच्या घरी (विशेष करून एकटे राहणाऱ्या) एक वही ठेवणार आहोत. तेथे आमचे अंमदार अधिकारी नियमीत जाऊन पाहणी करतील, त्यांच्याशी चर्चा करतील. तसेच न झाल्यास मला थेट फेसबुकवर अथवा मोबाइलवर संपर्क साधून कळवावे असे आवाहन पांडे यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com