Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्क! आता एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा कुठे होणार ?

Shivaji Park ठाकरेंनी महिन्यापूर्वीच महापालिकेत केला होता मैदानाचा अर्ज
Published on

Mumbai Political News : स्थापनेपासून शिवाजी पार्क अन् शिवसेनेचे अतूट नाते आहे. मात्र, पक्षात फूट पडल्यानंतर या मैदानावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत वाद सुरू झाला आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवरून वाद पेटला होता. या वादातून आता शिंदे गटाने माघार घेतल्याने शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडणार हे जवळपास निश्चित झाले आहे. आता शिंदे गटाने त्यांच्या मेळाव्यासाठी मैदानांची चाचपणी सुरू केली आहे. (Latest Political News)

गेल्या वर्षी शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर झाला होता. यंदा शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी क्रॉस मैदान किंवा ओव्हल मैदानाची चाचपणी सुरू असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितले आहे. शिवाजी पार्कच्या वादावर केसरकर म्हणाले, 'आमचा दसरा मेळावा क्रॉस किंवा ओव्हल मैदानावर होणार आहे. आम्हाला कुणाशीही भांडायचे नाही. त्यांना सहानुभूतीचे राजकारण करायचे आहे. बाळासाहेबांच्या विचारांपासून ते दूर गेले आहेत. हिंदुत्वाबाबत कुणीही काहीही बोलले तरी ते शांत बसताना दिसत आहेत,' अशी टीकाही केसरकरांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर केली.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
BJP Political News : आता खासदार होणार आमदार? राजस्थानसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

दरम्यान, शिवाजी पार्कवरून यंदा वाद निर्माण होऊन तो वाढू नये, यासाठी ठाकरे गटाने सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले. त्यांनी महिनाभरापूर्वीच हे मैदान आपल्याला मिळावे, यासाठी ठाकरे गटाकडून अर्ज दाखल केला होता. आता या वादातून शिंदे गटाने माघार घेतल्याने शिवाजी पार्क मैदान हे ठाकरे गटाला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता शिंदे गटाचा दसरा मेळावा कुठे होणार, याकडे राज्याचे लक्ष आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या वर्षी दोन्ही गटांनी (ठाकरे गट-शिंदे गट) मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळावे, यासाठी महापालिकेकडे अर्ज केला होता. महापालिकेने कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत दोन्ही पक्षांना परवानगी नाकारली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. शिवसेनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळून ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास परवानगी दिली होती.

यंदाही शिवाजी पार्क मिळावं म्हणून ठाकरे आणि शिंदे गटाने मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल केले होते. शिवाजी पार्क मैदान आपल्यालाच मिळणार, असा दावा दोन्ही गटांकडून करण्यात येत होता. त्यामुळे शिवाजी पार्कवर यंदा कोणाचा दसरा मेळावा पार पडणार, असा प्रश्न अनेकांना पडला होता. हा वाद पुन्हा न्यायालयात जाणार का, अशी चर्चा होती. पण शिंदे गटाने आपला अर्ज मागे घेतल्याने ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Anil Bonde News : यशोमती ठाकूरांबाबत बोलताना अनिल बोंडेंची जीभ घसरली; म्हणाले, "ठाकूरांमध्ये इंग्रजांचा 'डीएनए...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com