MA khan : शिवसेनेनंतर आता काँग्रेसमध्ये गळती सुरु : माजी खासदाराचा राजीनामा

congress : काँग्रेच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला राजीनामा देण्यासाठी मजबूर केलं. सर्वसामान्य कार्यंकर्त्यांची पक्षात कोणीही दखल घेत नाही, असा आरोप खान यांनी आपल्या पत्रात केला आहे.
ma khan
ma khansararnama
Published on
Updated on

मुंबई : गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेसमध्येही (congress) शिवसेनेसारखी गळती सुर होणार का,असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. तेलंगानामधील (telangana)काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्यसभेचे माजी खासदार एमए खान (ma khan) यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. (congress latest news)

खान यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून राजीनामा दिला आहे. जनतेला समजण्यात काँग्रेसला अपयश आले आहे, असे खान यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. या पत्रात त्यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

"राहुल गांधींनी पक्षाच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतरच काँग्रेसला त्रास सहन करावा लागला आहे. ब्लॉक लेव्हलपासून बूथ लेव्हलपर्यंत त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. आजपर्यंत त्यांच्याशी आमचं कधी जुळत नाही," असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

विद्यार्थी असतानाची खान यांनी कॉंग्रेसमधून आपल्या राजकीय जीवनाला प्रारंभ केला होता. चार दशकं ते काँग्रेसमध्ये सक्रिय होते.

ma khan
Ghulam Nabi Azad : आझाद स्वतंत्र पक्ष स्थापन करणार ; काश्मिरात पहिली शाखा

काँग्रेच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला राजीनामा देण्यासाठी मजबूर केलं. सर्वसामान्य कार्यंकर्त्यांची पक्षात कोणीही दखल घेत नाही, असा आरोप खान यांनी आपल्या पत्रात केला आहे.

"ज्येष्ठ सदस्यांशी कसं वागावं, हे राहुल गांधींना अजूनही कळत नाहीय. परिस्थिती लक्षात घेता, माझ्याकडं राजीनामा देण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता, पक्षाला अनेक दशकं मजबूत करणारे पक्षाचे सर्व दिग्गज आता पक्ष सोडत आहेत," असे त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com